Maharashtra Politics Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महाविकास आघाडीचं जागावाटप कधी ठरणार? कोणत्या पक्षाला किती जागा? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं

MVA Seat Allocation/ Assembly Election 2024 : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही जागावाटपावर भाष्य केलं आहे.

Sandeep Gawade

विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत तरी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आज, येत्या १० दिवसात जागावाटपाचं चित्र स्पष्ट होईल असं सांगितलं आहे. महाविकास आघाडीत कोण किती जागा लढवेल हे महत्त्वाचं नाही, तर जनतेच्या विरोधात असलेलं सरकार सत्तेतून बाहेर काढणे हे आमच्यासाठी महत्त्वाचं असल्याचंही ते म्हणाले.

पवार गटाच्या खासदार सुप्रीया सुळे यांच्या विषयी पोस्टर्स लागले होते. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्याला आला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटणं स्वाभाविक आहे. मात्र राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार हे येत्या काळात जनता ठरवणार आहे.

सत्यपाल मलिक महाविकास आघाडीचा प्रचार करणार का?

गेले दहा वर्ष मोदी सरकारने शेतकरी आणि जनतेचा अपमान केला विदर्भात दहा वर्षापूर्वी दिलेले आश्वासन मोदींनी पाळलेलं नाही आणि आता विदर्भात येऊन शेतकरी हिताची गोष्ट करतात. तसंच सत्यपाल मलिक महाविकास आघाडीचा प्रचार करतील असे अजून काही ठरलेले नाही. मात्र, त्यांचे वक्तव्य मी ऐकले आहे. सत्यपाल मलिक यांनी पुलवामा दहशतवादी घटनेबद्दल जेव्हा मोदी यांना फोन केला तेव्हा मोदींनी शांत राहण्यास सांगितल्याचे मलिक यांचा दावा आहे. त्या घटनेच्या जोरावरच मोदी 2019 मध्ये सत्तेत आले होते. सत्यपाल मलिक यांनी मोदीबद्दल ज्या गोष्टी सांगितले आहे, त्या सर्व भयावह आहे.

आपल्या देशातील परंपरा आहे की पंतप्रधान, मुख्यमंत्री, न्यायाधीश हे सार्वजनिक कार्यक्रमात एकत्रित आले, तर त्या वावगं काय. मोदी त्यांच्या घरी गेले त्यात ही काही गैर नाही, मात्र तिथले फोटो व्हायरल करणं योग्य नाही. महाराष्ट्राची निवडणूक उंबरठ्यावर असताना ज्या सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्ता परिवर्तनाच्या केसची सुनावणी सुरू आहे, त्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश निवृत्त होण्यापूर्वी महाराष्ट्राची सत्ता बदलाची केस वारंवार पुढे पुढे जाणे संशयास्पद आहे. शेड्युल 10 लोकशाहीचा गाभा आहे. असे असताना सवोच्च न्यायालयाने त्याबद्दल निर्णय राखून ठेवणे योग्य नाही, चिंतेची बाब आहे, असल्याची गंभीर टीका नाना पटोले यांनी केला आहे.

मोदींचे विदेशातले क्लिप काढून पहा. ते कसे वागतात, कोणाला भेटतात. हे रामदास आठवले यांनी पहावे. राहुल गांधी काय चूक म्हणाले. जी बाब घटनाकारांनी मांडली, बाबासाहेब यांनी मांडली, तेच राहुल गांधी यांनी सांगितलं. शीख समाजाबद्दलही राहुल गांधी काहीचं बोलले नाहीत.

काँग्रेसवर मोदींचे आरोप म्हणजे जन्मसिद्ध अधिकार आहे.. मोदी दहा वर्ष सत्तेत असताना देशासाठी काय केले हे सांगा. आरएसएस आणि भाजपने जे नरेटिव्ह तयार केले आहे, ते देशाला बरबाद करणारे आहे. मोदींची सत्ता असताना शहरी नक्षलवाद का नाही थांबवला? कोणी रोखले आहे त्यांना मोदी काही ही बोलतील आणि देश ऐकेल अशी स्थिती नाही. वर्ध्यात मोदींसाठी गर्दी कशी जमा केली होती हे सर्वांना माहीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News: स्तन वाढवण्यासाठी सर्जरी केली, काही तासांत १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या मंत्री भरत गोगावले यांचा ताफा शेतकऱ्यांनी रोखला

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

SCROLL FOR NEXT