Nana Patole Muddy Feet Washing By Congress Worker Saam Tv
महाराष्ट्र

Nana Patole Video: कार्यकर्त्याने चिखलाने माखलेले पाय खरंच धुतले का?, नाना पटोलेंनी घटनाक्रमच सांगितला

Nana Patole Muddy Feet Washing By Congress Worker: अकोल्यामध्ये गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी नाना पटोले गेले होतो. यावेळी त्यांचे चिखलाने माखलेले पाय काँग्रेस कार्यकर्त्याने धुतले होते. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे.

Priya More

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे चिखलाना माखलेले पाय कार्यकर्त्याने धुतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून नाना पटोले यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून जोरदार टीका होत आहे. अशामध्ये नाना पटोले यांनी याप्रकरणी पहिली प्रतिक्रिया देत संपूर्ण घटनाक्रम सांगितला. तसंच टीका करणाऱ्यांना देखील प्रत्युत्तर दिले आहे. 'कार्यकर्ता पाणी टाकत होता आणि मी पाय धूवत होतो.' असे म्हणत 'मी शेतकरी आहे चिखलात राहणारा माणूस आहे.', असे नाना पटोले यांनी सांगितले.

नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'पाय धुण्याचा व्हिडीओ मी पाहिला. कालची घटना जी झाली आहे त्यामध्ये मी पालखीसाठी गेलो होतो. पाय चिखलाने माखले होते. कार्यकर्ता वरुन पाणी टाकत होता आणि मी पाय धुवत होतो. आता नळ नाही ना. 'हर घर मे नल हर घर मे जल' नाही ना. नाही तर मी नळाचे पाणी घेतले असते.', असे म्हणत नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली.

नाना पटोले यांनी टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना सांगितले की, 'सरकारमध्ये असे किती लोकं आहेत जे अंधारामध्ये ईडीचा चिखल धुतात, कसे पाय धुतात, कसे डोकं दाबतात त्यांचे काढा ना. यामुळे मी शेतकरी आहे त्यामुळे मला चिखलाची सवयी आहे. तिथे चिखल आहे म्हणून मी गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेणार नाही अशातला मी नाही.' तसंच, 'मी शेतकरी आहे चिखलात राहणारा माणूस आहे. त्यामुळे मला काही फरक पडत नाही. मी राजा नाही आणि मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. मी शिवरायांचा मावळा आहे आणि मावळ्यासारखाच राहिल.', असे मत त्यांनी व्यक्त केले.

अकोल्यामध्ये नाना पटोले यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून चिखलाने माखलेले पाय धुवून घेतले त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड सुरू आहे. सत्ताधाऱ्यांनी नाना पटोले यांना धारेवर धरले आहे. 'ही घटना संतापजनक आहे. नाना पटोलेंनी स्वत:ला संत समजू नये. नाना पटोले यांनी लोकशाही आणि कार्यकर्त्याचा अपमान केला.' अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली. तर 'हीच खरी काँग्रेसची संस्कृती आहे.', अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली. तर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी देखील नाना पटोले यांच्यावर टीका केली. 'मनातील सरंजमशाही संतप नाही.', अशी टीका त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lava amoled Blaze 2 5G: लावा ब्लेझ एमोलेड २ ५जी लाँच, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स, किंमत आणि खास वैशिष्ट्ये

Maharashtra Politics : काँग्रेसचा गड ढासळला! सांगलीच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा, भाजपमध्ये करणार प्रवेश

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये अनेक बनावट व्होटर आयडी, ठाकरे गटाच्या नेत्याने केला पर्दाफाश

कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढलं, EPFO चा नवीन नियम, PF चे पैसे काढण्यासाठी येणार अडचणी

Maharashtra Politics: नंदुरबारमध्ये राजकीय भूकंप! माजी मंत्री राष्ट्रवादीच्या वाटेवर, अजित पवारांची ताकद वाढणार

SCROLL FOR NEXT