Nana Patole Devendra Fadanvis  Saam TV
महाराष्ट्र

Nana Patole News: 'भाजपकडून राज्यात अराजकता पसरवण्याचे काम..' कॉंग्रेसचे टीकास्त्र; सुनील केदारांवरील कारवाईवरुन व्यक्त केला संताप

Maharashtra Politics: महाराष्ट्रामध्ये सरकारने अराजकता निर्माण करून ठेवली आहे. सत्ताधारी पक्षाचे लोक अधिकाऱ्यांना धमकावत असल्याचे रोज पाहायला मिळतात.." अशी टीकाही नाना पटोलेंनी यावेळी केली.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर| ता. २४ डिसेंबर २०२३

Nana Patole News:

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात कॉंग्रेस नेते सुनील केदार यांना न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली. कोर्टाच्या निकालानंतर सुनील केदार यांची आमदारकीही रद्द करण्यात आली आहे. आज (रविवार, २४ डिसेंबर) सरकारकडून राजपत्र काढत याबद्दलची माहिती देण्यात आली. सुनील केदार यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर संताप व्यक्त केला आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

"देशामध्ये दोन कायदे झालेत. भाजपचे काछडिया नावाचे खासदार त्यांना हायकोर्टाने तीन वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यांचे सदस्यत्व त्या काळात रद्द करण्यात आले नाही. राहुल गांधी सुप्रीम कोर्टात जाण्याची परवानगी दिली. सुप्रीम कोर्टाने त्यांना न्याय दिला आणि त्यांची खासदारकी वाचली. विक्रम सैनी हे मुजफ्फरपुरचे भाजपचे आमदार आहेत. त्यांच्यावरही कारवाई झाली नाही.." असा आरोप नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.

सुनील केदार यांच्यावरील कारवाईवरुन संताप...

"सुनील केदार (Sunil Kedar) यांना खालच्या कोर्टाने पाच वर्षाची शिक्षा सुनावली. ज्या पद्धतीने भाजपाच्या खासदार, आमदारांना अपिल करण्याची संधी मिळाली. तसेच सुनील केदार यांनाही अपिलात जाण्याची संधी आहे. आज रविवार आहे. भाजपला एवढी काय घाई झाली होती..." असा संतप्त सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला. तसच सत्तेचा गैरवापर करण्याची प्रथा भाजपने सुरू केली आहे. सुनील कायदेशीर लढाई लढतील..." असेही पटोले यावेळी म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिंदे- पवार गटावर टीकास्त्र!

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा ऑडिओ व्हायरल होत आहे. या प्रकारावरुन नाना पटोलेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. शिंदे गट असो की अजित पवार गट असो त्यांच्यातले लोक हे वाशिंग मशीन धुतले गेलेले आहेत. त्यामुळे त्यांनी कोणालाही बंदुकीच्या गोळ्या घातल्या तरी त्यांना मोकळीक आहे.. असे नाना पटोले म्हणाले.

"महाराष्ट्रामध्ये सरकारने अराजकता निर्माण करून ठेवली आहे. त्याचा हा परिणाम आहे. अधिकाऱ्यांना सत्ता पक्षाचे लोक धमकवत हे रोज पाहायला मिळतात.." अशी टीकाही नाना पटोलेंनी यावेळी केली. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT