Sunil Kedar News: काँग्रेसला मोठा धक्का! माजी मंत्री सुनील केदार यांची आमदारकी रद्द

Sunil Kedar News: १५० कोटींच्या जिल्हा बँक घोटाळ्यात न्यायालयाने त्यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.
Sunil Kedar Latest News
Sunil Kedar Latest NewsSaam TV
Published On

Sunil Kedar News:

राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर सुनील केदार यांना दुसरा धक्का बसला आहे. सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. १५० कोटींच्या घोटाळा प्रकरणात न्यायालयाने त्यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता नियमानुसार त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बहुचर्चित नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याचा ( Nagpur District Bank Scam) शुक्रवारी (२२ डिसेंबर) निकाल लागला. या प्रकरणात कोर्टाने राज्याचे माजी मंत्री आणि कॉंग्रेसचे विद्यमान आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांना ५ वर्षांच्या कारावासाची आणि १२.५० लाख रुपये रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

सुनील केदार यांना २ वर्षांपेक्षा अधिक काळाची शिक्षा सुनावल्याने नियमानुसार त्यांची आमदारकी रद्द होणार असल्याची चर्चा होती. याबाबत पोलिसांनी कोर्टाचे आदेश विधीमंडळास पाठवले होते. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी अखेर निर्णय घेतला असून सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. एकीकडे आगामी निवडणूकांची मोर्चेबांधणी सुरू असतानाच ही कारवाई झाल्याने कॉंग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sunil Kedar Latest News
Solapur Accident News: भरधाव दुचाकीची ट्रॉलीला जोरदार धडक; अपघातात जिगरी मित्राचा जागीच मृत्यू, एक जखमी

२००२ साली नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १५६ कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड झालं होतं. या प्रकरणाचा आता तब्बल २२ वर्षांनी निकाल लागला. ज्यामध्ये जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले होते. सुनील केदार यांच्यासह ६ जणांना न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे, तर ३ जणांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Sunil Kedar Latest News
Manoj jarange Patil: अंतरवाली सराटी ते मुंबई... मनोज जरांगेंनी सांगितला मराठा आरक्षण आंदोलनाचा संपूर्ण प्लान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com