Mahayuti Meeting Nagpur:  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महायुतीची महाबैठक! CM शिंदे, फडणवीस अन् अजित पवारांमध्ये ४ तास खलबतं; बैठकीत काय काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी

Mahayuti Meeting Nagpur: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये ही महत्वाची बैठक पार पडली. तब्बल चार तास चाललेल्या या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Gangappa Pujari

पराग ढोबळे| नागपूर, ता. १ ऑगस्ट २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली असून महायुती तसेच महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या जोर- बैठका सुरू आहेत. अशातच नागपूरमध्ये काल महायुतीच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये ही महत्वाची बैठक पार पडली. तब्बल चार तास चाललेल्या या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

नागपूरमध्ये महायुतीची महाबैठक!

लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे तीनही नेते काल नागपूरमध्ये होते. कार्यक्रमानंतर तिन्ही नेते उपराजधानीत मुक्कामी आहेत. यादरम्यान काल रात्री उशिरा मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये महत्वाची बैठक पार पडली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल,सुनील तटकरेही या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये महायुतीचे जागा वाटप, विधानसभेची रणनिती याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

तब्बल चार तास बैठक

बैठकीत राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या तिकीट वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली असून महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विद्यमान आमदारांचे मेरीट तपासून त्यांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला गेल्याची चर्चा आहे. तसेच महाविकास आघाडीच्या आमदारांच्या मतदारसंघात महायुतीचा दूसऱ्या क्रमांकाचा कोण सक्षम उमेदवार आहे? याचीही चाचपणी करून चर्चा झाली.

बैठकीय काय काय ठरलं?

त्याचप्रमाणे राज्यात ज्याप्रमाणे वातावरण सुरू आहे आणि विरोधी पक्षाकडून होत असलेल्या टिकेला उत्तर देण्यासंदर्भात सुद्धा चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीतील घटक पक्षांना किती जागा सोडता येऊ शकते? कोणत्या जागा दिल्या जाऊ शकतात या संदर्भात विचारविनिमय झाला. तसेच गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांनी केलेली वादग्रस्त विधाने चर्चेत आहेत. त्यावरही या बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT