CM Eknath Shinde Independence Day Saamtv
महाराष्ट्र

CM Eknath Shinde News: स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्याचा प्रयत्न... स्वातंत्र्यदिनी CM एकनाथ शिंदेंच्या खास शुभेच्छा

CM Eknath Shinde Independence Day: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहन पार पडले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Happy Independence Day 2023: आज देशाचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. देशभर उत्साहाचं वातावरण आहे. राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरंग्याला सलामी देत देशवासियांना संबोधित केले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहन पार पडले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळातील विकासकामांचीही माहिती दिली.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी "राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना आनंद होत आहे. गरजूंच्या दुःखावर फुंकर घातली पाहिजे. पंतप्रधान यांनी मेरी माटी मेरा देश कार्यक्रम घेऊन आपल्याला जबाबदारीच आठवण करुन दिली. स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया दिली.

तसेच यावेळी पुढे बोलताना केंद्र सरकारप्रमाणे राज्यातही विकासाच्या दृष्टीने केंद्र आणि राज्याचा समन्वय ठेवण्याचे काम आम्ही करत आहोत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचीही साथ मोठ्या प्रमाणावर मिळते... असेही ते म्हणाले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस...

महाराष्ट्रातील नागरिकांना शुभेच्छा देतो. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हा तिरंगा सन्माने डौलत राहील. अशी प्रार्थना करतो.. अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.  मोदींच्या नेतृत्वात देशाचा आणि शिदेंच्या नेतृत्वात राज्याचाच विकास करणार आहोत.. असेही ते यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक्सप्रेसवेवर भयंकर अपघात, सिनिअर काँग्रेस नेते अन् चालकाचा मृत्यू

Maharashtra Live News Update : पुण्यात अवकाळी पावसाचा कहर पुण्यासाठी आज आणि उद्या येल्लो अलर्ट

Summer Tips: उन्हाळ्यात आईस्क्रिम खावे की नाही?

टॅब चोरी केला; 200 अश्लील व्हिडिओ; 1200000 रुपयांची खंडणी, नाशिकमध्ये सेक्स कँडल उघडकीस

Honey Singh And Badshah: 'कलेच्या नावाखाली अश्लीलता चालणार नाही…'; हनी सिंग आणि बादशाहला हायकोर्टाचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT