eknath shinde ajit pawar ANI
महाराष्ट्र

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा होणार खांदेपालट? एकनाथ शिंदे-अजित पवार मुख्यमंत्री होणार? कुणी दिली ऑफर?

Chief Minister : राज्यात पुन्हा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा रंगल्यात.. त्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे आणि ती सुद्धा भाजपच्या सहकार्याशिवाय. मात्र हे समीकरण यशस्वी होणार का? आणि शिंदे आणि अजित पवारांना कुणी ऑफर दिलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Yash Shirke

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं मात्र मंत्रिपद, पालकमंत्रिपदावरुन कुरघोडीचं राजकारण रंगल्याने शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरल्याची चर्चा रंगलीय...या पार्श्वभुमीवर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिलीय.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला 230 जागांचं बहुमत मिळालंय. तर महायुती सरकारमध्ये तब्बल 42 मंत्र्यांनी शपथ घेतलीय. मात्र निधीवाटप, पालकमंत्रिपद यावरुन शह-काटशहाचं राजकारण रंगलंय.. त्यामुळे अस्वस्थ असलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना काँग्रेसने साद घातलीय.. मात्र सर्वाधिक आमदार असलेल्या भाजपविरोधात अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटाचं महाविकास आघाडीसोबत समीकरण शक्य आहे का? पाहूयात.

एकनाथ शिंदे-अजित पवार मविआसोबत जाणार?

- महाविकास आघाडीकडे 50 आमदारांचं संख्याबळ

- अजित पवारांसोबत 41 आमदारांचं संख्याबळ

- एकनाथ शिंदेंकडे 57 आमदारांचं संख्याबळ

- शिंदे गट आणि अजित पवार गट मविआसोबत गेल्यास बहुमत शक्य

हे असं असलं तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र नाना पटोलेंनाच उलट ऑफर दिलीय.. तर बावनकुळेंनी पटोलेच काँग्रेसला सोडण्याचा विचार करतील, असा टोला लगावलाय.

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतही सगळं काही आलबेल नाही. त्यातच काँग्रेसचे नेते भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करत आहेत.. त्यापार्श्वभुमीवर नाना पटोलेंमध्ये एवढा कॉन्फिडन्स कुठून आला? नाना पटोलेंनी तीन्ही पक्षाची चर्चा केली आहे का? समोरासमोर आल्यानंतर शिंदेंकडे बघणंही टाळणारे उद्धव ठाकरे शिंदेंना तर शरद पवार अजित पवारांना स्वीकारणार का? यावर नव्या राजकीय भूकंपाची तीव्रता ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT