Maharashtra Monsoon Session Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Monsoon Session : आचारसंहिता जाहीर होण्याआधीच ७५ हजार कोटींपर्यंतच्या निविदा मंजूर; आव्हाडांच्या आरोपांवरून सभागृहात गदारोळ

Maharashtra Monsoon Session Update : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधीच ७५ हजार कोटींपर्यंतच्या निविदा मंजूर करण्यात आल्या. प्रत्येक मतदारसंघात ५०, ७० ते ८० कोटी रुपये वाटण्यात आले. असा गंभीर आरोप आव्हाडांनी महायुतीवर केला.

Sandeep Gawade

सुरज मसुरकर, साम टीव्ही प्रतिनिधी

अर्थसंकल्पावर आज नेहमीप्रमाणे सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चर्चा सुरु होती. ही चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुती सरकारवर लोकसभा निवडणुकीवरून गंभीर आरोप भर सभागृहात केले. यावरून भाजपचे सर्व आमदार आक्रमक झाले आणि एकच गदारोळ पहायला मिळाला. कारण आव्हाडांनी आरोपही तसाच केला.

आव्हाड म्हणाले, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधीच अवघ्या काही दिवसांत ७५ हजार कोटींपर्यंतच्या निविदा मंजूर करण्यात आल्या आणि त्यातूनच प्रत्येक मतदारसंघात ५०, ७० ते ८० कोटी रुपये वाटण्यात आले. असा गंभीर आरोप आव्हाडांनी महायुतीवर केला. मात्र यावरून भाजपचे आणि महायुतीचे सर्वच आमदार आक्रमक झाले. मात्र आव्हाड एवढ्यावरचं थांबले नाहीत, आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती पैश्याचा पाऊस पाडेल पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काय झालं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काय झालं? या स्मारकांचं काम कुठवर आलं? हे लोक सांगणार नाहीत. आणि यानंतर भाजपच्या नेत्यांनी देखील याचा जोरदार विरोध केला.

आमदार अतुल भातळकर आणि आमदार संजय कुटे हे प्रचंड आक्रमक झालेले पहायला मिळाले. आम्ही हे खोटे आरोप अजिबात सहन करणार नाही, आज अर्थसंकल्पावर चर्चा होणे अपेक्षित होते, पण हा आरोप आम्ही सहन करणार नाही अस भातखळकरांनी ठणकाऊन सांगत, ज्या व्यक्तीवर अपहरणाचा आणि लोकांना बंगल्यावर नेउन मारण्याचा खटला सुरू आहे, त्यांनी आमच्यावर बोलू नये असा पलटवार भातखळकरांनी आव्हाडांवर केला.

यानंतर दुसरा वार हा आमदार संजय कुठे यांनी केला. जितेंद्र आव्हाड जे म्हणतात जो त्यांनी आरोप केलाय त्याचे त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का ? अस कुठे म्हणाले. एक रूपया जास्त खर्च केला नाही, त्यामुळे आव्हाडांनी केलेलं वक्तव्य रेकाँर्डवरुन काढून टाकावे अन्यथा आव्हाडांनी पुरावे द्यावे असही ते म्हणाले. यावरुन एक वाद आज पहायला मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईच्या पश्चिम दुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Nora Fatehi Photos: नोरा आली अन् वातावरण बदललं, फोटोशूट पाहून चाहते घायाळ

दिवाळीनंतर सर्वसामान्यांची 'चांदी'; दरात ३५ हजारांची घसरण, सोन्याच्या भावातही घट होणार?

ICC Women's World Cup 2025: वर्ल्डकप सेमीफायनलचा थरार रंगणार, भारत-ऑस्ट्रेलिया पुन्हा भिडणार, कधी होणार सामना?

Kalyan Dombivli Crime : दादा, भाईंची आता खैर नाही! नाशिकनंतर कल्याण डोंबिवलीत पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT