CM Eknath Shinde maharashtra politics Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिंदे गटात नाराजी नाट्य! आमदारांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी मंत्र्यांना सुनावलं; प्रकरण काय?

Shivsena Shinde Group News: पक्षातील मंत्री काम घेऊन गेल्यानंतर काम करत नसल्याची तक्रार शिवसेनेतील आमदारांनी केली आहे. याबद्दलची नाराजीही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे (Eknath Shinde) बोलून दाखवली.

सुरज सावंत

Maharashtra Politics News:

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरमध्ये सुरुवात होत आहे. राज्यात सध्या सुरू असलेला आरक्षणाचा वाद, अवकाळी पावसाने केलेले नुकसान तसेच ड्रग्ज प्रकरणाने ढवळून निघालेले राजकारण या विषयांवर विरोधक- आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षातील सर्व मंत्र्यांना तंबी दिल्याची बातमी समोर आली आहे. काय आहे हे प्रकरण, जाणून घ्या..

काम होत नसल्याची आमदारांची तक्रार..

शिवसेना शिंदे गटातील (Shivsena Shinde Group) आमदार आणि मंत्र्यांमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. पक्षातील मंत्री काम घेऊन गेल्यानंतर काम करत नसल्याची तक्रार शिवसेनेतील आमदारांनी केली आहे. याबद्दलची नाराजीही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे (Eknath Shinde) बोलून दाखवली.

एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना सुनावलं

आमदारांच्या या नाराजी नाट्यानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्र्यांना तंबी देण्यात आली. तसेच पक्षातील सर्व विधानसभा सदस्यांना अधिवेशन कालावधीत (Winter Session 2023) जास्तीत जास्त उपस्थित राहण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरला!

दरम्यान, राज्याच्या रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपताच मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात आपले नाव असेल का, याची उत्सुकता भाजप, तसेच अजित पवार गट आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या अश्विनी निकम

Golmaal 5: अक्षय कुमारची 'गोलमाल 5' मध्ये एन्ट्री; अजय देवगणसोबत करणार जबरदस्त अॅक्शन

Heart Attack कधीच येणार नाही! वेळीच करा 'हे' बदल; चाळीशीनंतरही हृदय निरोगी राहील

Contrast Blouse: साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाउज कसा निवडायचा?

हॉटेलमध्ये जेवणानंतर बडीशेप का दिली जाते?

SCROLL FOR NEXT