CM Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

CM Eknath Shinde: नैराश्येने ग्रासलेले; तडीपार लोक एकत्र.. 'इंडिया आघाडी'च्या सभेवर CM शिंदेंची जहरी टीका

Maharashtra Politics Breaking News: लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे जागा वाटपासंदर्भात बैठकांचा धडाका सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.

सुरज सावंत

CM Eknath Shinde Press Conference:

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे जागा वाटपासंदर्भात बैठकांचा धडाका सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी शिंदे सरकारच्या कार्यकाळ आणि कामांवर भाष्य केले तसेच कालच्या इंडिया आघाडीच्या सभेवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

"शेतकरी, युवकांचा रोजगार आणि उद्योग यामध्ये महाराष्ट्र सध्या पुढे आहे. कोस्टल रोड, मेट्रो, अटल सेतू, अशी अनेक कामे आजही प्रगती पथावर आहेत. मात्र हेच प्रकल्प याधीच्या सरकारमध्ये रखडले होते. आज केंद्र आणि राज्यसरकारच्या डबल इंजिन सरकारने अनेक कामांना प्राधान्य दिले. कॅबिनेट बैठकीतून ५५ लोकहिताचे निर्णय आम्ही हाती घेतले ते निर्णय तुमच्यासमोर आहेत. झालेली कामे पाहता मी समाधानी आहे," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

इंडिया आघाडीच्या मुंबई सभेवर टीकास्त्र..

"कालची सभा ही फॅमिली गॅदरिंग होती. नैराश्येने ग्रासलेले लोक, जनतेने तडीपार केलेले लोक एकत्र आले होते. ते धरून बांधून एकत्र आलेत. सावरकरांच्या स्मारकासमोर आणि बाळासाहेब यांच्या स्मृतीस्थळासमोर ही सभा झाली हा काळा दिवस होता. ज्यांच्या विरोधात लढले त्यांच्यासोबत बसले. उद्धव ठाकरे यांनी खरी बाळासाहेबांची माफी मागायला हवी," असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीवर (India Aaghadi) टीका केली.

मोदींचे स्वप्न पूर्ण करणार..

तसेच "विजय शिवतारे भेटले मी त्यांना युती धर्म पाळण्यास सांगितले आहे. महायुतीत सर्व शिवसैनिक जो उमेदवार देतील तो निवडून आणणार आहोत. जागा वाटप समन्वयाने होईल, योग्य वेळी निर्णय होईल ४५ जागा पार होईल, असे म्हणत मोदींजींचे ४०० पारचे स्वप्न पुर्ण करु.." असेही एकनाथ शिंदे म्हणाले. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CV आणि Resume मध्ये काय फरक आहे माहितीये का? 99% लोकांना नसेल माहिती

Winter Skin Care : थंडीत मुलायम त्वचेसाठी लावा 'हा' पदार्थ, कोरडेपणा मिनिटांत होईल दूर

Leopard Liefspan: बिबट्या किती वर्षे जगतो?

Post Office: पोस्टात जाण्याची झंझट संपली, आता मोबाईलवरूनच होणार सर्व कामं; Dak Seva 2.0 अ‍ॅप कसे वापरायचे?

Maharashtra Live News Update : नाशकात २० हजार कोटींपेक्षा जास्त कामे हाती घेतली आहेत - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT