BJP MLA Rajendra Patni Passed Away at The Age of 59 Saamtv
महाराष्ट्र

Rajendra Patni Passed Away: भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन; वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

BJP MLA Rajendra Patni Passed Away: भारतीय जनता पक्षाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र पाटणी आजारी होते.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, प्रतिनिधी|ता. २३ फेब्रुवारी २०२४

Rajendra Patni Died:

राजकीय वर्तुळातून एक दुर्देवी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र पाटणी आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट..

'अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली,"

"ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो," असे देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

दरम्यान, राजेंद्र पाटणी हे वाशिमच्या (Washim) कारंजा मतदारसंघातील आमदार होते. ते आधी शिवसेना पक्षात होते. त्यानंतर ते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करत आमदार म्हणून निवडून आले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. याच आजाराने त्यांचे निधन झाले. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

SCROLL FOR NEXT