eknath shinde news  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठाकरेंना धक्क्यावर धक्के, आधी सांगली आता पुणे आणि अहमदनगरमध्ये शिवसैनिकांनी साथ सोडली

Eknath Shinde And Uddhav Thackeray: राज्यभरात शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर सुरू आहे. शिंदे गट एकापाठोपाठ एक ठाकरे गटाला मोठे धक्के देत आहे. सांगलीनंतर आता पुणे आणि अहमदनगरमधील पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाची साथ सोडली आहे.

Priya More

शिवसेना ठाकरे गटाला एकापोठापाठ एक धक्के बसत आहेत. सांगली पाठोपाठ आता पुणे आणि अहमदनगरमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडले आहे. शिवसैनिकांनी ठाकरेंची साथ सोडली असून लवकच ते शिंदे गटामध्ये प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी हा ठाकरेंना मोठा धक्का असून आता शिंदेसेनेची ताकद आणखी वाढणार आहेत.

पुण्यातल्या कसबा विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडी तसेच पुण्यातील अनेक शाखा प्रमुख आणि शिवसैनिक शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे. आज संध्याकाळी मुंबईत हे सर्वजण धनुष्यबाण हाती घेणार आहेत. शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश होणार आहे. ठाकरे गटाच्या नेत्या आश्विनी मल्हारे, प्रतीक्षा महाले, भक्ती जगदाळे, सुप्रिया खेडकर, समीरा प्रधान, दिपाली पोटे, नूतन शरद दिवार आणि वैजयंती फाटे हे सर्वजण शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

तर दुसरीकडे, अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज मुंबई येथे संदेश कार्ले हे हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. संदेश कार्ले यांनी विधानसभा निवडणुकीत पारनेर विधानसभेसाठी तिकीट मागितले होते मात्र त्यांना तिकीट मिळाले नव्हते त्यामुळे ते नाराज होते.

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात देखील ठाकरे गटाचे २४ नगरसेवक असताना तिकीट श्रीगोंदा मतदारसंघात दिले. त्यामुळे संदेश कार्ले यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर उद्धव ठाकरे देखील भेटायला वेळ देत नसल्याने संदेश कार्ले यांनी ठाकरे गटाला राम राम ठोकत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अहमदनगरमध्ये ठाकरे गटाला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नाही. पक्ष प्रवेशासाठी आज शेकडो शिवसैनिक मुंबईला रवाना झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Extramarital Affair : धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नी झाली वैरी; एका फोनवर नवऱ्याला दिला विजेचा शॉक

LIC Scheme: LICची जबरदस्त योजना! दररोज ४५ रुपये गुंतवा अन् २५ लाख मिळवा

Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे भीषण कार अपघातात निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Tumor warning signs: शरीरात ही ७ लक्षणं दिसली तर समजा कॅन्सरचा ट्यूमर होतोय तयार

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

SCROLL FOR NEXT