A BJP MLA’s social media post sparks controversy after Shinde Sena’s defeat in Chhatrapati Sambhajinagar municipal elections. saam tv
महाराष्ट्र

Mahayuti: छत्रपती संभाजीनगरात भाजप-शिंदेसेना आमनेसामने; पराभवावरून आमदारानं डिवचलं

Chhatrapati Sambhajinagar Politics: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा मोठा विजय मिळालाय. यावरून भाजपच्या एका आमदाराने शिंदे सेनेवर टोमणा मारलाय. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात युतीमध्ये तणाव निर्माण होईल, असा दावा केला जातोय.

Bharat Jadhav

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाची एकहाती सत्ता

  • शिंदे सेनेला महापालिका निवडणुकीत दारुण पराभव

  • भाजप आमदाराच्या सोशल मीडिया पोस्टमुळे वाद

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाने एकहाती सत्ता मिळवली. तर एकनाथ शिंदे यांची शिवसेनेला दारूण पराभव झालाय. शिवसेनेच्या पराभवावरून भाजप आमदारानं सोशल मीडिया पोस्ट करत शिवसेनेला डिवचलंय. त्यामुळे राज्यातील सत्तेत एकत्र असणाऱ्या शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिगणी पडणार असल्याची चर्चा सुरू झालीय. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचा उन्माद करू नका, असा सल्ला नेत्यांना दिला होता. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आमदारानेच सोशल मीडियावर पोस्ट करत मित्रपक्षला डिवचलंय.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळणार आहे. दुसऱ्याबाजुला महायुतीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला मात्र १३ जागांवर येथे समाधानी व्हावे लागले. शहरात शिवसेनेचे खासदार, पालकमंत्री, दोन आमदार असतानाही शिवसेनेवर पराभवाची नामुष्की आलीय. यावरून भाजप आमदाराने शिवसेनेच्या नेत्यांना टोमणा मारलाय. भाजपच्या राजू शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदार खासदारांना डिवचले आहे.

सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून छत्रपती संभाजीनगरच्या शिवसेनेच्या आमदार, खासदारांना आता समजले असेल तुम्हाला निवडून आणण्यासाठी खरी ताकद कोणाची होती, असे लिहिले आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी जागा वाटपावरून शिवसेना भाजपमध्ये जुंपली होती. आता निवडणुकीनंतर दोघांमध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

स्वबळावर लढवली निवडणूक

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेसोबत युती न करण्याचा भाजपचा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला. दुसरीकडे पालकमंत्री संजय शिरसाट यांना स्वबळाच्या निर्णयाचा फटका बसलाय. शिवसेना मात्र १३ जागा जिंकू शकली. दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरुद्ध जरी लढले असले तरी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. मात्र एका बाजुला महापालिकेतील सत्तेसाठी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. पण भाजप आमदाराने डिवचणारी पोस्ट केल्यानं दोन्ही पक्षात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे.

का झाला पराभव?

शिंदेच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर नेत्यांच्या मुलांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे पक्षात नाराजीचे वातावरण होते. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या मुला-मुलीला उमेदवारी दिली होती. वर्षानुवर्षे महापालिकेत नगरसेवक, माजी महापौर राहिलेल्यांनाचा तिकीट वाटपात प्राधान्य दिलं गेलं. त्यामुळे ठाकरे गट आणि इतर पक्षातून आलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईच्या महापौरपदासाठी रस्सीखेच, एकनाथ शिंदे मोठा डाव टाकणार, 'हॉटेल पॉलिटिक्स' सुरू

Weight Loss : चटपटीत चाट खा अन् वजन कमी करा, आताच लिहून घ्या 'ही' सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: भाजपकडून जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी

Face Care: चेहरा ग्लोईंग आणि सॉफ्ट हवाय? रात्री झोपताना 5 मिनिटात तयार होणारी होममेड पेस्ट लावा

Amravati Politics: नवनीत राणा यांना पक्षातून निष्कासित करा; भाजप उमेदवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT