Chandrashekhar Bawankule gets major national responsibility from BJP saam tv
महाराष्ट्र

चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रमोशन; भाजपनं राष्ट्रीय पातळीवर दिली मोठी जबाबदारी

BJP Promotes Revenue Minister Chandrashekhar Bawankule : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केली असून विविध नेत्यांवर जबाबदाऱ्या सोपवल्या जात आहेत. भाजपने चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर संघटनात्मक सहप्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे.

Bharat Jadhav

  • भाजपने नवी महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपवली

  • आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी बावनकुळेंची सहप्रभारीपदी नियुक्ती

  • राजस्थानमध्ये निवडणूक तयारीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक मोर्चेबांधणीला वेग

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

मराठा आंदोलक मनोज जरांगेंकडून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केला जातेय. त्याचदरम्यान भाजपनं प्रमोशन करत बावनकुळे यांच्यावर मोठी जबाबदारी दिलीय. काही दिवसापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चांनी राजकीय वातावरण तापलं होतं. आता पक्षानं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी दिलीय. भाजपनं आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू सुरू केली आहे. त्याचपार्श्वभूमीवर संघटनात्मक सहप्रभारी नेत्यांची नियुक्ती करण्यात आलीय आहे.

आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या संघटनात्मक सहप्रभारी पदी बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आलीय. राज्यात बावनकुळेंवर जरांगे पाटील टीकास्त्र सोडत असताना दुसऱ्या बाजूने भाजपकडून बावनकुळे यांना राष्ट्रीय जबाबदारी देण्यात आलीय. बावनकुळे यांना नवी जबाबदारी मिळाल्यानंतर भाजप नेते भागवत कराड यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

संघटनात्मक जबाबदारी का दिली?

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळीही चंद्रशेखर बावनकुळे यांची पक्षाचे मुख्य निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात होती. त्यांच्या पक्षसंघटनेतील कामाचा दांडगा अनुभव आणि शिस्तप्रिय कार्यपद्धती लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतलाय. बावनकुळे यांनी यापूर्वी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही यशस्वीपणे काम पाहिले आहे.

मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपमधील फेरबदलाबाबत मोठा दावा केला होता. केंद्रीय मंत्रिमंडळात होणाऱ्या बदलामुळे राज्यातील मंत्रिमंडळात ही मोठा बदल होणार असल्याचा दावा राऊतांनी केला होता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये जाणार आणि त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा भाजपमध्ये सुरू असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. राऊतांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलं होतं. बावनकुळेंना मुख्यमंत्री नाही पण केंद्रात मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे.

जरांगे-बावनकुळे वाद

गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करत आहेत. बावनकुळेंच्या आदेशानंतर कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचा आरोप जरांगे करत आहेत. त्यावरून जरांगे आक्रमक झाले असून बावनकुळे यांच्यावर घणाघाती टीका करत आहेत. राज्यभरात बावनकुळेंवर टीका होतेय. त्याचदरम्यान भाजपनं बावनकुळेंवर मोठी जबाबदारी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक

VIDEO : आता मला ट्युशन घ्यावं लागेल; विद्यानंद बापटांच्या मराठीचं कौतुक करताना फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया

Kalki 2 Casting: 'कल्की २८९८ एडी'च्या नावाने फेक कास्टिंग; वैयक्तिक माहिती, पैसे देऊ नका, निर्मात्यांनी केलं सावध

संजय राऊतांना कॅन्सर; ईडीच्या तुरुंगातूनच आजाराची सुरुवात, ठाकरेंच्या खासदाराचा धक्कादायक खुलासा

Krishna Janmashtami 2026: जन्माष्टमी स्पेशल! बाळकृष्णाला नैवेद्यासाठी बनवा 5 पारंपरिक पदार्थ

SCROLL FOR NEXT