Pankaj Tadas Press Conference  Saam Tv
महाराष्ट्र

Pankaj Tadas: माझ्यावर विषप्रयोग झाला होता, पत्नीच्या आरोपानंतर पंकज तडस यांचा खुलासा

Pankaj Tadas On Sushma Andhare Allegations: सुषमा अंधारे यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी वर्ध्याचे भाजप उमेदवार रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता, असा खळबळजनक खुलासा पंकज तडस यांनी पत्नीच्या आरोपांनतर केला आहे.

Rohini Gudaghe

चेतन व्यास साम टीव्ही, वर्धा

सुषमा अंधारे यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी वर्ध्याचे भाजप उमेदवार रामदास तडस (Pankaj Tadas On Sushma Andhare Allegations) पुत्र पंकज तडस यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे.त्यांनी पत्रकार परिषदेत काही ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप दाखवल्या आहेत. या कथित ऑडिओ क्लिप भास्कर इथापे आणि पूजा तडस यांच्या असल्याचा त्यांनी दावा केला आहे.

पत्नीच्या आरोपांनतर पंकज तडस (Pankaj Tadas) यांनी आजची पत्रकार परिषद सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपच खंडन करण्यासाठी असल्याचं सांगितलं आहे. जनतेसमोर त्यांनी आज त्यांची बाजू मांडली आहे. हे प्रकरण २०२० मधील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काही लोकांनी काटकरसास्थान करून फसविण्याचा प्रयत्न केला. त्याला ते बळी पडले. यासाठी त्यांनी न्यायालयात दाद मागितल्याचं देखील (Maharashtra Politics) म्हटलं आहे.

निवडणुकीच्या तोंडावर रामदास तडस आणि माझ्या या प्रकरणाशी संबंध जोडून पत्रकार परिषद घेतली. रामदास तडस यांनी मला 2020 मध्ये बेदखल केलं होतं. त्यामुळे आजही मतभेद (Pankaj Tadas Press Conference) आहे. यामुळे विरोधकांनी हा कट रचल्याचं तडस यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की, त्यांची पत्नी पूजा शेंद्रेवर आजपर्यंत चार प्रकरण आहेत. पूजा शेंद्रेसह दहा लोकांवर तक्रार आहे. या दहा आरोपींवर न्यायालयाने विविध कलमन्वये गुन्हे दाखल केले आहे. या तक्रारीत पंकज तडस यांच्याशी विवाह करण्याकरिता गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल आहे. ही तक्रार न्यायल्यात प्रलंबित असल्याचं पंकज तडस यांनी सांगितलं आहे.

पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक ऑडिओ क्लिप दाखवली आहे. या क्लिपमध्ये 'आपल्या नावावर काहीही करून घे' अशी चर्चा आहे. लग्न केल्याचं खोटं सांगितलं, असं चित्र रंगवायचं (Wardha News) आहे. आपली फिल्डिंग प्रॉपर आहे कोणाला इंटरटेन करू नका असाही उल्लेख आहे. लग्नाचे डॉक्युमेंट शो कर. पोलीस प्रशासनाच सहकार्य मिळत नाही, असं दाखवावं. परिवारातील सर्वांची तक्रार करा, असाही उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये आहे. ही ऑडिओ क्लिप हरीश इथापे आणि पूजा शेंद्रे यांची असल्याचं पंकज तडस यांनी म्हटलं होतं.

माझ्यावर विषप्रयोग झाला होता, असा खळबळजनक खुलासा पंकज तडस यांनी केला आहे. पूजा शेंद्रे हे सर्व प्रसिद्धी आणि राजकीय फायदा घेण्यासाठी करत आहे. फक्त ब्लॅकमेलिंग आणि प्रॉपर्टीवर कब्जा करण्यासाठी केल्याचं त्यांनी (Wardha Lok Sabha Election) म्हटलं आहे. हे सर्व विरोधी पक्षांनी हातात धरून केल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

या सर्व क्लिपवरून हे प्रकरण राजकीय बदनामीसाठी होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या सर्व आरोपींना घेऊन माझ्या जीवाला आणि परिवाराला धोका आहे. आईवडिलांचं राजकीय वलय बदनाम करण्यासाठी हा घात असल्याचं पंकड तडस यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेमध्ये ते म्हटले की, सुषमा अंधारे (Sushma Andhare Allegations) माझ्याकडे आल्या असत्या त्यांनी माझी बाजू ऐकून घेतली असती, तर त्यांनी पत्रकार परिषद घेतली नसती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT