Rahul NArvekar Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'सर्वच आमदार पात्र कसे काय? हा संशोधनाचा विषय..' नार्वेकरांच्या निकालावर भाजप आमदाराचा सवाल

MLA Disqualification Result: सगळेच पात्र कसे आहेत, हे थोडे समजून घ्यावे लागेल. निकाल पूर्ण समजणे शक्य झाले नाही, येत्या एक ते दोन दिवसा मध्ये त्याची स्पष्टता येईल," असं राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

Gangappa Pujari

बालाजी सुरवसे, धाराशिव|ता. ११ जानेवारी २०२४

Maharashtra Politics News:

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल अखेर लागला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी या निकालाचे वाचन करत एकनाथ शिंदेचा गटच खरी शिवसेना असल्याचे सांगितले. या धक्कादायक निकालावर विरोधकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना सर्वच आमदार पात्र कसे काय? हा संशोधनाचा विषय असल्याचा टोला भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी लगावला आहे.

काय म्हणाले राणा जगजितसिंह पाटील?

"विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड.राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यामुळे शिंदे गटाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हा निकाल अपेक्षितच होता परंतु सर्वच आमदार पात्र कसे काय ? हा संशोधनाचा विषय असून पुढील दोन दिवसात याचे सविस्तर विश्लेषण समजून येईल," अशी प्रतिक्रिया तुळजापूरचे भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आमदार अपात्रतेच्या निकालावर दिली आहे.

"नेमके आमदार कोणाकडे जास्त होते ? पक्ष साधारण कोणाकडे जायला हवा, नैसर्गिक न्यायाचा विचार केला तर हा निकाल अपेक्षितच होता. एक बाब मला अजूनही समजली नाही. जरा विश्लेषण करावे लागेल की सगळेच पात्र कसे आहेत, हे थोडे समजून घ्यावे लागेल. निकाल पूर्ण समजणे शक्य झाले नाही, येत्या एक ते दोन दिवसा मध्ये त्याची स्पष्टता येईल," असं राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सामनामधून राहुल नार्वेकरांवर टीका...

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिलेला निकाल म्हणजे घटना, कायद्याचा मुडदा पाडून दिल्लीच्या मदतीने महाराष्ट्रावर केलेला आघात आहे. विधानसभा अध्यक्षांनी सकाळीच सांगितले होते, 'बेंचमार्क' निर्णय देऊ. प्रत्यक्षात लोकशाहीचे तोंड जगात काळे करणारा निर्णय त्यांनी दिला आहे, अशी टीका सामना मुखपत्रातून केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: ऋतुराज गायकवाड मायदेशी परतणार! या खेळाडूला बॅकअप म्हणून थांबवलं; शमीबाबतही घेतला निर्णय

Pune Crime: आधी अपहरण, नंतर निर्घृण हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येने पुणे हादरले

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

SCROLL FOR NEXT