Maharashtra Assembly Election 2024:  Saamtv
महाराष्ट्र

Satara Politics: 'रामराजेंना झोपेतही मीच दिसतो, शेवटी बायको...', जयकुमार गोरेंची जहरी टीका; नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Assembly Election 2024: भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांनी विधानपरिषद माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली.

ओंकार कदम

Jaykumar Gore Vs Ramraje Naik Nimbalkar: 'रामराजे नाईक निंबाळकर यांना जिकडे तिकडे मीच दिसतो. रामराजे झोपेतसुद्धा जयकुमार गोरेच्या नावाने चावळतात शेवटी बायको झोपेतून उठून सांगते जयकुमार गोरे नाही मी आहे इथं... ' असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांनी विधानपरिषद माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. विखळे येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळख असणाऱ्या खटाव तालुक्यातील 42 गावांची टेंभू प्रकल्पांतर्गत मान खटाव उपसा सिंचन योजनेचा विखळे येथे आमदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करून कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला माजी आमदार दिलीप येळगावकर उपस्थित होते. यावेळी खटाव तालुक्यातील 42 गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत असताना आमदार जयकुमार गोरे यांनी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जयकुमार गोरेचा रामराजेंना प्रचंड राग आहे जयकुमार गोरे हा रामराजेंना एवढा टोचतो एवढा टोचतो की झोपेत सुद्धा जयकुमार गोरे च्या नावाने रामराजे चावळत असतात छोटी बायको झोपेतून उठून सांगते जयकुमार गोरे नाही मी आहे इथं. उठता बसता झोपता चालता सुद्धा रामराजेंना सगळ्या वेळी जयकुमार गोरेच दिसत आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपासून रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार अशी चर्चा होती. याबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली आहे. रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधु संजीवराजे निंबाळकर आणि विधानसभा आमदार दीपक चव्हाण हे अजित पवारांची साथ सोडून शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. तर रामराजे नाईक निंबाळकर मात्र अजित पवारांसोबत राहणार आहेत पण ते महायुतीचा प्रचार करणार नाहीत, असा निर्णय त्यांनी घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: ऋतुराज गायकवाड मायदेशी परतणार! या खेळाडूला बॅकअप म्हणून थांबवलं; शमीबाबतही घेतला निर्णय

Pune Crime: आधी अपहरण, नंतर निर्घृण हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येने पुणे हादरले

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

SCROLL FOR NEXT