Raj-Uddhav Thackeray saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: BMC तील मलिदा खाण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र, शिंदेंच्या मंत्र्याचा खोचक टोला

Raj-Uddhav Thackeray Alliance: मुंबई महानगर पालिकेतील मलिदा खाण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याची खोचक टीका मंत्री शंभूराज देसाई यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

Priya More

Summary -

  • ठाकरे बंधू बीएमसीतील मलिदा खाण्यासाठी एकत्र आलेत

  • मंत्री शंभूराज देसाई यांचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना खोचक टोला

  • राज ठाकरे यांनी नमो पर्यटन योजनेवर केलेल्या टीकेला देसाई यांचे प्रत्युत्तर

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मुंबई महानगरपालिकेचा मलिदा समोर दिसत असल्याने ते आता एकत्र आले आहेत. दोन विरुद्ध बाजूला टोक असणारी लोकं फक्त पालिकेतील सत्तेसाठी एक आली असून आम्ही दोघे भाऊ एकत्र मिळून मुंबई पालिकेतील मलिदा खाऊ, अशी भावना या दोघांची आहे.' असा खळबळजनक आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. तसंच, 'विकासाचे व्हिजन असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालीलच महापौर मुंबई महापालिकेत बसेल.', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी महायुती सरकारच्या नमो पर्यटन केंद्र या योजनेवर टीका केली होती. गडकिल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यतिरिक्त इतर कोणाचे नावे असू नयेत, असं काही निदर्शनास आलं तर त्या वस्तूची तोडफोड केली जाईल असा इशारा देखील राज ठाकरे यांनी यावेळी दिला होता. राज ठाकरे यांच्या या टीकेला पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले आहे. 'राज ठाकरे यांनी नमो पर्यटन संकल्पना ही समजून घ्यायला हवी होती. आम्ही गडकिल्ल्यांवर नाही तर किल्ल्यांच्या पायथ्याला नमो पर्यटन केंद्र उभे करणार आहोत.', असे त्यांनी सांगतिले.

तसंच, 'राज ठाकरे यांनी केलेली टीका ही अपुऱ्या माहितीच्या आधारे असून त्यांनी पूर्ण माहिती घेऊन बोलावे. एका वर्षापूर्वी ठाणे येथे पीएम नरेंद्र मोदी यांचे तोंड भरून कौतुक करणाऱ्या राज ठाकरे यांनी आज त्यांच्याच नावाने सुरू होणाऱ्या एका योजनेवर टीका करणे म्हणजे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे.', असा टोला यावेळी पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई यांनी लगावला. त्याचबरोबर, 'शासकीय कोणतेही उभं राहीलेलं काम तोडफोड करण्याचा कोणत्याही घटकाने प्रयत्न केला तर शासन हाताची घडी घालून गप्प बसणार नाही.' असा इशारा शंभूराज देसाई यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी खुशखबर! १० तोळा सोन्याचे दर २८०० रुपयांनी घसरले; वाचा सविस्तर

Aamir Khan GF Gauri : "कहा से आते हो आप लोग..."; पाठलाग करणाऱ्या पापाराझींवर आमिर खानची गर्लफ्रेंड भडकली, पाहा VIDEO

Plum Cake Recipe : महागडा 'प्लम केक' घरीच सिंपल पद्धतीने बनवा, फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Lava Bold N1 5G: कमी पैशात हाय-टेक फोन! 5000mAh बॅटरी, मोठी स्क्रीन आणि जबरदस्त फीचर्स, किंमत किती?

Maharashtra Live News Update : राज ठाकरे दादर स्थानकावर दाखल; लोकलने चर्चगेटला जाणार | VIDEO

SCROLL FOR NEXT