Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शिंदे गटाला भाजपकडून धक्का! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी हाती घेतलं 'कमळ'

Maharashtra Political News : कोकणामध्ये भाजपकडून शिंदे गटाचे कार्यकर्ते फोडल्यास सुरुवात केल्याची चर्चा सुरु आहे. या चर्चांवर शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाने प्रतिक्रिया दिली आहे.

Yash Shirke

  • रत्नागिरीत शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

  • महायुतीत मित्रपक्षाकडून मित्रपक्षाला धक्का मिळाल्याच्या चर्चा सुरु आहेत.

  • या प्रकरणावर शिंदेसिनेच्या जिल्हाप्रमुखाने स्पष्टीकरण दिले आहे.

  • भाजपमध्ये प्रवेश करणारे ठाकरे गटाचे आहेत, आमचे नाही, असे शिंदेंच्या जिल्हाप्रमुखाने म्हटले आहे.

Maharashtra : राज्यभरात सर्वपक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या निवडणुकांच्या आधी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महायुतीली सत्ताधारी मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये चुरस असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात दोन्ही पक्षात कुरघोडी सुरु झाल्याचे म्हटले जात आहे.

रत्नागिरीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे जेव्हा रत्नागिरी दौऱ्यावर होते, तेव्हा हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. एकूणच प्रकरणामुळे कोकणात शिंदे गटाला भाजपाकडून हादरा बसला आहे, असे म्हटले जात आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाच्या रत्नागिरीतील कार्यकर्त्यांना फोडण्याचे काम शिंदे गटाकडून करण्यात आले. पण जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेचे कार्यकर्ते फोडण्यास सुरुवात झाली आहे. मित्रपक्षानेच मित्रपक्षाचे कार्यकर्ते फोडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कोकणातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाचणे ग्रामपंचायतीतील सदस्य, शाखाप्रमुखांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मोठ्या संस्थेने महिला कार्यकर्त्यांनीही शिंदे गट सोडून भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या वेळी मंत्री नितेश राणे उपस्थित होते.

रत्नागिरीचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राहुल पंडीत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 'भाजपमध्ये प्रवेश करणारे कार्यकर्ते हे ठाकरे गटाचे होते, आमचे नव्हते. त्यांना आम्ही शिंदे गटामध्ये प्रवेश करण्यास सांगितले होते. पण त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला', असे वक्तव्य राहुल पंडीत यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early Cancer Detection: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात? वेळेवरील निदानाने वाचेल तुमचा जीव

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Chicken Fry Recipe: घरीच कुरकुरीत चिकन फ्राय कसे बनवायचे?

SCROLL FOR NEXT