Bjp agitations Against india Alliance in Mumbai Kolhapur on Jagdeep Dhankhar Mimicry Row  Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: उपराष्ट्रपतींच्या मिमिक्री प्रकरणावरुन भाजप आक्रमक, 'इंडिया आघाडी'विरोधात राज्यभर निदर्शने

Jagdeep Dhankhar Mimicry Row : उपराष्ट्रपतींचा अपमान झाल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपकडून आज राज्यात विविध भागात रस्त्यावर उतरुन विरोधी खासदारांचा निषेध नोंदवला जात आहे.

Gangappa Pujari

Maharashtra Politics News:

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याकडून विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करण्यात आले. या कारवाईनंतर संसदेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करताना तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती धनखड यांची नक्कल केली.

यावेळी कॉंग्रेस खासदार राहुल गांधी हे व्हिडिओ काढत होते. या प्रकारानंतर भारतीय जनता पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच भाजपकडून आज राज्यात विविध भागात रस्त्यावर उतरुन विरोधी खासदारांचा निशेष नोंदवला जात आहे.

मुंबईत निदर्शने..

मुंबईचा कांदिवली पश्चिमेकडील भाजप (BJP) जिल्हा कार्यालय उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी विरोधी पक्षांच्या खासदारांविरोधात आणि राहुल गांधी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. तसेच मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली लालबाग येथेही आंदोलन करण्यात आले.

पोलिसांत तक्रार दाखल करणार..

"दोन दिवसांपूर्वी TMC खासदार आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उपराष्ट्रपती धनखड यांचा अवमान केला. याविरोधात देशभरात संतापाची लाट आहे. या प्रकरणी आम्ही काळाचौकी पोलीस स्टेशनला जाऊन कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात पोलीस तक्रार करणार आहोत.." अशी माहिती भाजपचे मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छत्रपती संभाजीनगरमध्ये जोडे मारो आंदोलन..

तृणमूल काँग्रेस खासदार कल्याण बॅनर्जी (Kalyan Banerjee) यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची नक्कल केल्याच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या वतीने इंडियाआघाडीमधील नेत्यांच्या प्रतिमेला 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस आणि 'इंडिया आघाडी' विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कोल्हापुरात निदर्शने..

दरम्यान, कोल्हापूरमध्येही (Kolhapur) उपराष्ट्रपतींच्या अपमानाच्या निषेधार्थ आज भाजपाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात अली आहे. यावेळी तृणमुल कॉंग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या फोटोला 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरातील बिंदू चौक इथे भाजप कार्यकर्त्यांकडूम इंडिया आघाडीविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

SCROLL FOR NEXT