Maratha Reservation : 'अल्टिमेटम' संपण्याआधीच बीडमध्ये मनोज जरांगेंची तोफ धडाडणार, काय असेल पुढील दिशा?

Manoj Jarange patil Beed Sabha : बीड शहरालगत असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात ही जाहीर सभा होत आहे. सकल मराठा समाज आणि समाज बांधवांकडून सभेची जय्यत तयारी सुरू आहे.
Maratha Reservation, Manoj Jarange Patil, Beed Sabha
Maratha Reservation, Manoj Jarange Patil, Beed SabhaSAAM TV
Published On

Manoj Jarange Sabha in Beed :

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आरपारची लढाई सुरू केली आहे. सरकारला त्यांनी २४ डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. ही मुदत संपत आहे. त्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे २३ डिसेंबरला बीडमध्ये त्यांची 'निर्णायक इशारा सभा' होणार आहे. या सभेत ते काय बोलणार? मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, हे स्पष्ट होईल.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बीड (Beed News) शहरालगत असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात ही जाहीर सभा होत आहे. सकल मराठा समाज आणि समाज बांधवांकडून (Maratha aarakshan) सभेची जय्यत तयारी सुरू आहे. या सभेसाठी मोठं मैदान तयार करण्यात आलं आहे.

स्टेजची देखील उभारणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर येणाऱ्या मराठा (Maratha Reservation) बांधवांची गैरसोय होऊ नये, यासाठी मैदानावर स्वच्छता केली जात आहे. २४ तारखेची सरकारला दिलेली मुदत संपण्याच्या आदल्या दिवशी ही सभा होत आहे. या सभेत मनोज जरांगे पाटील (manoj Jarange patil) काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ट्रॅक्टरचालकांना नोटिसा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपणार आहे. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास मुंबईत मोर्चा धडकेल असा इशारा जरांगेंनी दिलाय. या इशाऱ्यानंतर प्रशासनानं सावध पावलं उचलली असल्याचं दिसतंय.

नांदेड जिल्ह्यातील कंधार पोलिसांनी ट्रॅक्टरचालकांना नोटीसा बजावल्या आहेत. मराठा नेते, कार्यकर्ते ट्रॅक्टरसाठी आले तर ते देऊ नयेत. तसेच सोबत ट्रॅक्टरही घेऊन जाऊ नये, असं या नोटिसांत म्हटलं आहे.

Maratha Reservation, Manoj Jarange Patil, Beed Sabha
Breaking News Live Updates: जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या ट्रकवर दहशतवाद्यांचा हल्ला, महिन्याभरातील दुसरी घटना

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची गरज नाही - मनोज जरांगे

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याची गरज नाही. राहिला प्रश्न निवडणुकीचा, तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत सरकार निवडणुका घेणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. शेवटच्या श्वासापर्यंत मी आरक्षणाची लढाई लढणार, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

Maratha Reservation, Manoj Jarange Patil, Beed Sabha
Maratha Reservation: मराठा आंदोलक मुंबईत धडकण्याची धास्ती; पोलिसांकडून ट्रॅक्टर चालकांना नोटीसा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com