Breaking News Live Updates: जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या ट्रकवर दहशतवाद्यांचा हल्ला, महिन्याभरातील दुसरी घटना

Maharashtra Breaking Updates Live in Marathi: आज गुरूवार २१ डिसेंबर २०२३, देश विदेशासह महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट वाचा फक्त साम टीव्हीवर...
Maharashtra Breaking News Live Update
Maharashtra Breaking News Live UpdateSAAM TV
Published On

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या ट्रकवर दहशतवाद्यांचा हल्ला, महिन्याभरातील दुसरी घटना

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या ट्रकवर दहशतवाद्यांचा हल्ला झाल्याची घटना घडली आहे.

एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत या भागातील लष्करावर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.

भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. अजूनही गोळीबार सुरू आहे.

गोळीबारात काही जवान जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. पुंछच्या सुरनकोट भागातील डेरा की गली, ज्याला डीकेजी म्हणूनही ओळखले जातं. या भागात ही घटना घडली आहे.

जिल्हा न्यायालयाचे झाले धाराशिव नामांतर; विधीज्ञ मंडळाने पेढे वाटून केला आनंद साजरा

धाराशिव येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे नाव आजपासून धाराशिव असं करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयाने अधिसूचना काढल्यानंतर कोर्टाचे नाव उस्मानाबाद ऐवजी धाराशिव असं करण्यात आलं आहे. कोर्टाच्या बोर्डावरील नाव तात्काळ बदलण्यात आलं आहे. यानंतर जिल्हा विधिज्ञ मंडळातर्फे पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला आहे.

संसदेच्या अधिवेशनाचं सूप वाजलं, ३१ जानेवारी २०२४ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे आज, गुरुवारी सूप वाजले. पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे.

Manoj Jarange News | सरकारच्या शिष्टमंडळाला मनोज जरांगेंनी काय सांगितलं? पाहा व्हिडिओ 

संसदेतील खासदार 'निलंबन सत्र' सुरूच, लोकसभेचे ३ खासदार निलंबित

New Delhi :

लोकसभेतील आणखी तीन खासदारांचे निलंबन

दीपक बैज, डी. के. सुरेश, नकुल नाथ यांच्यावर कारवाई

संसदेतील निलंबित खासदारांनी एकूण संख्या १४६ वर

मुंबईतील दहिसर लिंक रोड पुलावर भीषण अपघात, २ ठार, १ गंभीर

मुंबई उपनगरातील दहिसर पूर्वेकडील आनंद नगर लिंक रोड पुलावर लक्झरी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृत व्यक्तींमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला दहिसर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दहिसर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ निष्ठा यात्रा; वर्ध्यातून मुंबईत 'मातोश्री'वर येणार

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ वर्ध्यातून निघणार निष्ठा यात्रा

सायकलने 864 किलोमीटरचा प्रवास करत गाठणार मुंबई

बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेधणार जनतेचे लक्ष

युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात निष्ठा यात्रा

23 डिसेंबरला निघणार यात्रा, 30 डिसेंबरला पोहोचणार मातोश्रीवर

संसदेचं हिवाळी अधिवेशन एक दिवस आधीच होणार तहकूब

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे आजच सूप वाजणार

संध्याकाळी चार वाजल्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केले जाणार आहे

फेब्रुवारी महिन्यात होणार यापुढचे बजेट अधिवेशन

एक दिवस आधीच अधिवेशन संपवल जाणार

उद्या होता अधिवेशनाचा शेवटचा दिवस

संसद सुरक्षाभंग घटनेनंतर सरकारचा मोठा निर्णय, सुरक्षेची जबाबदारी CISF वर

संसद सुरक्षाभंग घटनेनंतर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. संसद सुरक्षेची जबाबदारी आता सीआयएसएफकडे दिली जाणार आहे. अतिमहत्वाच्या ठिकाणी ही यंत्रणा कार्यरत असते. गृहविभागाच्या अखत्यारित आता ही सुरक्षा व्यवस्था असेल.

Corona in Mumbai : मुंबईत गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, मास्क वापरा; BMC अलर्टवर

मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांची पत्रकार परिषद

नवीन व्हेरियंट हा ओमिक्रानचा एक प्रकार आहे. सौम्य आहे. पालिकेने कालच यासंदर्भात आढावा घेतला.

आम्ही केंद्र सरकारने जे निर्देश दिले आहेत, त्यानुसार काम करणार आहोत.

सर्व रुग्णांची तपासणी करण्याच्या सूचना सर्व रुग्णालयांना दिल्या आहेत.

आम्ही चाचण्या वाढवणार आहोत. सगळ्यांनी सतर्क राहावं.

ज्यांच्यामध्ये लक्षणे आहेत. त्यांनी विलगीकरणात राहावं. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. मास्कचा वापर करावा.

Ahmednagar Accident : नगर जिल्ह्यात रस्ते अपघातात वर्षभरात 800 बळी

अहमदनगर जिल्ह्यातील विविध भागांत वर्षभरात झालेल्या अपघातात जवळपास 800 जणांना प्राण गमवावे लागल्याची माहिती समोर आली आहे. सर्वाधिक अपघात नाशिक-पुणे, नगर - मनमाड आणि छत्रपती संभाजीनगर, राष्ट्रीय महामार्गावर झाले आहेत. इतर मार्गांवरही अपघातांची मालिका सुरूच असून, त्यात आता ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचीही भर पडली आहे.

Breaking News Live Updates: सरकारवर आमचा विश्वास नाही, जरांगे सांगतील तीच पूर्वदिशा; मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया

आमच्यासाठी मनोज जरांगे पाटील सांगतील तीच पूर्व दिशा असणार आहे. 23 तारखेला मनोज जरांगे पाटील काय बोलणार आणि आम्हाला काय आवाहन करणार आहेत. त्याचबरोबर ते काय भूमिका घेणार आहेत ? तीच भूमिका आमची असणार आहे, अशा प्रतिक्रिया मराठा बांधवांनी दिल्या.

आमचा फक्त मनोज जरांगे पाटलांवर विश्वास आहे, सरकारवर नाही, असंही मराठा बांधव म्हणाले. मनोज जरांगे यांची २३ डिसेंबरला बीडमध्ये इशारा सभा होणार आहे. या सभेसाठी मराठा बांधवांनी जंगी तयारी करीत असून सभास्थळावरून त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची गरज नाही - मनोज जरांगे

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याची गरज नाही. राहिला प्रश्न निवडणुकीचा, तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत सरकार निवडणुका घेणार नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. शेवटच्या श्वासापर्यंत मी आरक्षणाची लढाई लढणार, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

तर ते कांद्याची माळ गळ्यात घालून आले असते; सुप्रिया सुळेंचा भाजपवर निशाणा

सुप्रिया सुळे यांनी खासदार निलंबनाच्या मुद्द्यावरून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. ही लोकशाहीची हत्या आहे. आम्ही फक्त कांद्याच्या भावावर बोलत होतो. आमच्या जागी भाजप असता तर, कांद्याच्या माळा गळ्यात घालून आला असता, असा टोला सुळेंनी लगावला.

सरकारला दिलेला अल्टिमेटम संपणार, त्याआधीच बीडमध्ये मनोज जरांगेंची जाहीर सभा

Beed News :

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम संपण्यापूर्वी, २३ डिसेंबरला बीडमध्ये त्यांची निर्णायक इशारा सभा होणार आहे. याच सभेची जय्यत तयारी मराठा तरूण आणि बांधवांकडून सुरू आहे.

बीड शहरालगत असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात ही जाहीर सभा होत आहे. सकल मराठा समाज आणि समाज बांधवांकडून सभेची जय्यत तयारी सुरू आहे. या सभेसाठी मोठं मैदान तयार करण्यात आलं आहे. स्टेजची देखील उभारणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर येणाऱ्या मराठा बांधवांची गैरसोय होऊ नये, यासाठी मैदानावर स्वच्छता केली जात आहे. २४ तारखेची सरकारला दिलेली मुदत संपण्याच्या आदल्या दिवशी ही सभा होत आहे. या सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pune Water Shortage : पुणे शहरातील अनेक भागात आज पाणीपुरवठा बंद

संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा आज दिवसभर राहणार बंद

पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद

शुक्रवारी देखील कमी दाबाने आणि उशिरा पाणीपुरवठा होणार

Sassoon Hospital : ससून रुग्णालयात कैद्यांच्या वॉर्डसाठी नवी नियमावली

ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालय प्रशासन उचलणार अनेक पावले

ससून रुग्णालयातील कैद्यांचा अतिरिक्त मुक्काम होणार कमी

ससून रुग्णालयात कैद्यांसाठी आता नवीन नियमावली

रुग्णालय प्रशासनाकडून नवी कैदी रुग्ण समिती देखील करण्यात येणार स्थापन

कैद्यांना देण्यात येणाऱ्या उपचारांवर नवी समिती ठेवणार लक्ष

नव्याने स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये सात सदस्यांचा असणार समावेश

प्रत्येक महिन्याला कैद्यांचा बोर्ड समिती घेणार आढावा

मराठा आंदोलकांना ट्रॅक्टर देऊ नका; पोलिसांच्या ट्रॅक्टरचालकांना नोटीसा

मराठा नेते, कार्यकर्ते आपल्याकडे ट्रॅक्टर मागण्यासाठी आले तर देऊ नये , किंवा आपण स्वतः ट्रॅक्टर सोबत घेउन जाऊ नये, अशा आशयाची नोटीस नांदेड जिल्हयातील कंधार पोलिसांनी ट्रॅक्टर मालकांना पाठवली आहे.

मराठा आरक्षणासाठी येत्या 24 डिसेंबर रोजी मुंबईत मराठा समाज मोठया संख्येने जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी ट्रॅक्टरचालकांना नोटीसा पाठवल्या आहेत.

ट्रॅक्टर घेउन गेल्यास वाहतुकीस अडथळा , लोकांची गर्दी होईल, असं झाल्यास आपल्याला जबाबदार धरून कारवाई करुन ट्रॅकटर जप्त केल जाईल, असा इशाराही नोटीसीत देण्यात आला आहे.

Breaking News Live Updates: मराठवाड्यातील ५ लाख लोकांना मिळणार कुणबी प्रमाणपत्र; प्रशासनाची माहिती

मराठवाड्यात १ नोव्हेंबर पासून ३ हजार ४६२ कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. ८ जिल्ह्यात दोन कोटी पुराव्यांची सविस्तर पडताळणी केल्यानंतर २७ हजार मराठा- कुणबी पुरावे सापडले आहेत.

या पुराव्याच्या आधारे मराठवाड्यातील साडेपाच लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकेल असा दावा विभागीय प्रशासनाने केलाय.

शिवाय एका पुराव्याच्या आधारे २० जणांना वंशावळप्रमाणे प्रमाणपत्र मिळू शकेल. अशी माहिती प्रशासनाने न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला सादर केली आहे.

गिरीश महाजन आज घेणार मनोज जरांगेची भेट

विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाची बुधवारी सांगता झाली आहे. यंदाचं हिवाळी अधिवेशन मराठा आरक्षणामुळे चांगलंच गाजलं. शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत कायदा करणार असल्याचं सांगितलं.

दुसरीकडे मनोज जरांगे यांनी २४ डिसेंबरच्या आत आरक्षण द्या, अन्यथा मोठं आंदोलन करू, असा इशारा सरकारला दिला. आज सरकारमधील मंत्री गिरीश महाजन अंतरवाली सराटी गावात जाऊन जरांगे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार आहे.

राज्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सिंधुदुर्गात 'जेएन 1' विषाणूचा रूग्ण आढळला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

राज्यात थंडीचा कडाका वाढला असून येत्या ४ दिवसांत हुडहुडी वाढणार असं हवामान खात्याने सांगितलं आहे. तर भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला अर्जून पुरस्कार जाहीर झाला आहे. यासह तुमच्या जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्यांचा वेगवाग आढावा घेण्यासाठी साम टीव्हीचा लाईव्ह ब्लॉग वाचत राहा...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com