Maval Assembly Constituency  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ब्रेकिंग! मावळात विधानसभेसाठी महायुतीत रस्सीखेच; अजित पवार गटाच्या उमेदवाराला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध

Maval Assembly Constituency Vidhan Sabha Election 2024: मावळमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील शेळकेंच्या उमेदवारीला विरोध कायम आहे. भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं समोर आलंय.

Rohini Gudaghe

दिलीप कांबळे, साम टीव्ही मावळ

राज्यात सध्या महायुती सत्तेत आहे. भाजप, शिवसेना, आणि राष्ट्रवादी या तीन घटक पक्ष सरकार सध्या राज्य चालवत आहे. मात्र, मावळात चित्रं वेगळं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात मावळ विधानसभेच्या जागेवरून कलगीतुरा सुरू असल्याचं चित्र दिसून येतंय. भाजपने मावळ विधानसभेवर दावा केलाय. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीमधील इतर कोणत्याही पक्षाचे काम करणार नाही, असा एकमताने निर्णय घेण्यात आलाय. मावळमध्ये भाजपने विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन केलं होतं.

मावळ विधानसभा मतदारसंघ

मावळ विधानसभा हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मात्र, सध्या अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) सुनील शेळके हे आमदार आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा एकही कार्यकर्ता सुनील शेळके यांच काम करणार नाही, असं मावळ निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांच्यासह कार्यकर्ते सांगत आहेत, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये मावळच्या जागेवरून मोठा राजकिय पेच निर्माण होण्याची शक्यता (Maval Assembly Constituency) आहे.

महायुतीत रस्सीखेच

मावळ विधानसभा एकेकाळी भाजपचा (BJP) बालेकिल्ला होता. मात्र २०१९ साली भाजपने मावळ प्रांत गमावला. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. अजित पवार गटाने भाजपच्या परंपरागत असलेल्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. मात्र, साडेचार वर्षे आमदार सुनील शेळके यांनी भाजप कार्यकर्त्यांना त्रास दिल्याचा आरोप करण्यात (Maharashtra Poliics) आलाय. तसेच मावळातून भाजपला हद्दपार करण्याचा प्रयत्न सुनील शेळकेंकडून करण्यात आला. त्यासाठी भाजप घड्याळाचे काम करणार नाही, असा सूर भाजप कार्यकर्त्यानी काढला आहे.

अजित पवार गटाच्या उमेदवाराला विरोध

त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मावळची निवडणूक रंगतदार होणार (Vidhan Sabha Election) आहे. भाजप संकल्प मेळाव्यात आमदार सुनील शेळके यांच्या कामाचा पाढा वाचून काढण्यात आलाय. भाजप कार्यकर्त्यांची गळचेपी करणारा आमदार पुन्हा मावळात नकोय, असा एकमतांनी फतवा भाजप तालुका अध्यक्ष दत्तात्रय गुंड यांनी काढला असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT