Maharashtra Politics saam tv
महाराष्ट्र

NCP MLAs at Raj Bhavan: राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट? अजित पवार राजभवनात, शरद पवारांच्या पुणे कार्यालयाबाहेर तणावाचं वातावरण

Split In NCP: अजित पवार राष्ट्रवादीतील काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

Dnyaneshwar Choutmal

Ajit Pawar News: राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार काही आमदारासोबत राजभवनावर दाखल झाले आहे. अजित पवार राष्ट्रवादीतील काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. अजित पवारांना राष्ट्रवादीतील ४० आमदारांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे.

दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये फूट पडणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मोतीबागेतील कार्यालयात दाखल झाले आहे. शरद पवार यांच्या दालनात रोहित पवार देखील आहेत. दोघांमध्ये चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. दरम्यान शरद पवार यांच्या पुणे कार्यालयात सध्या तणावाचं वातावरण आहे. शरद पवार यांच्या पुणे कार्यालयात सर्वदूर शांतता दिसत आहेत.

अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीतील काही आमदारांची बैठक बोलवली होती. या बैठकीला सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, अमोल कोल्हे यांच्यासह जवळपास 18 आमदार उपस्थित होते. मात्र या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गैरहजर होते अशी माहिती आहे. ॉपरंतु काही वेळापूर्वीच शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांनी आपल्याला अजित पवार यांनी बोलवलेल्या बैठकीबाबात माहिती नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर अजित पवार काही आमदारांना सोबत घेऊन थेट राजभवनात दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करायला सुरुवात

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

Healthy Breakfast: नाश्त्यासाठी बनवा कमी साहित्याचा 'हा' पौष्टीक पदार्थ

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

SCROLL FOR NEXT