Nashik Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिवसेनेला मोठं खिंडार! ३५ वर्षांपासूनच्या निष्ठावंताने सोडली उद्धव ठाकरेंची साथ; भाजपचं 'कमळ' घेतलं हाती

Nashik Politics: नाशिकमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार पडले आहे. ३५ वर्षांपासूनच्या निष्ठावंताने उद्धव ठाकरेंची साथ सोडली. अनेक बड्या नेत्यांनी भजापचे कमळ हाती घेतलं.

Priya More

Summary:

  • शिवसेना ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला

  • माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

  • उपनगराध्यक्ष नईम खान आणि नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला

  • मागील निवडणुकीत इगतपुरीत शिवसेनेची एकहाती सत्ता होती

नाशिकमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. नाशिकमध्ये शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. इगतपुरी नगरपरिषदेवर गेल्या ३० वर्षांपासून एकहाती सत्ता राखणारे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजपचे कमळ हाती घेतले आहे. संजय इंदुलकर यांच्यासोबत अनेक बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला.

मिळालेल्या माहितीनुसार, इगतपुरीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शिवसेनेला हा धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नगराध्यक्ष संजय इंदुलकर, उपनराध्यक्ष नईम खान यांच्यासह अनेक नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहे. ३५ वर्षांपासून इगतपुरीमध्ये सत्तेवर असलेले शिवसेनेचे नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी पक्षाची साथ सोडत भाजपात प्रवेश केला.

नगराध्यक्ष संजय इंदुलकर, उपनगराध्यक्ष नईम खान, नगरसेवक संपत डावखर आणि रमेश खातळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील भाजप पक्ष कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांनी पक्षप्रवेश केला. या सर्वांच्या पक्ष प्रवेशामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाची ताकद कमी झाली असून भाजपची ताकद वाढली आहे.

दरम्यान, मागच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह १८ पैकी १४ जागांवर शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली होती. तर भाजपला फक्त ४ जागांवर विजय मिळवता आला. तर शिवसेनेने तिकीट नाकारलेल्या एकाने अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवला होता. तर बहुजन विकास आघाडी, काँग्रेस आणि भारिपचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला होता. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर संजय इंदुलकरांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Crime:धक्कादायक! विद्यार्थिनीवर मास्तराची वाईट नजर; अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Maharashtra Live News Update: ठाण्यातील पार्कमधील इमारतीच्या जाळीला अचानक आग

कल्याणकरांसाठी मोठी बातमी! आरोग्य विभागाने माता आणि नवजात बालकांसाठी घेतला गेमचेंजर निर्णय

Rupali Thombare: अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा, नेमकं काय प्रकरण?

White Collar Terror: व्हाईट कॉलर दहशतवाद, दिल्ली स्फोटाशी 5 डॉक्टराचं कनेक्शन ?

SCROLL FOR NEXT