Uddhav thackeray  Saam tv
महाराष्ट्र

Nashik Politics: नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार, २ दिग्गज नेत्यांसह १० जण भाजपच्या गळाला

Maharashtra Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला. २ दिग्गज नेत्यांसह १० जणांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली असून ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Priya More

नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार पडले आहे. नाशिकमधील ठाकरे गटाचे अनेक नेते एकापाठोपाठ उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना दिसत आहेत. अशामध्ये आता उद्धव ठाकरे यांना नाशिकमध्ये आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि नवनियुक्त महानगरप्रमुख मामा राजवाडे यांनी पक्षाला रामराम ठोकला असून ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी हा ठाकरे गटाला मोठा धक्का समजला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाला नाशिकमध्ये पुन्हा एकदा मोठा धक्का बसला. ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि नवनियुक्त महानगरप्रमुख मामा राजवाडे यांनी नुकताच उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विलास शिंदे शिवसेना शिंदे गटात गेल्यानंतर त्यांच्या जागी महानगरप्रमुख म्हणून मामा राजवाडे यांची नियुक्ती झाली होती. अवघ्या ८ दिवसांतच मामा राजवाडे यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. सुनिल बागुल आणि मामा राजवाडे यांच्यासह माजी नगरसेवक देखील भाजपात प्रवेश करणार आहेत.

नाशिकमध्ये एका महाराण प्रकरणात सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाकरे गटाच्या या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांनी भाजपत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नाशिकमध्ये या दोघांच्याही भाजप प्रवेशाची आता जोरदार चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून अनेक जण सोडून जात असल्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये इनकमिंक सुरू असल्यामुळे नाशिकमध्ये भाजपची ताकद चांगलीच वाढली आहे.

दरम्यान, जानेवारी २०२१ मध्ये भाजपचे माजी प्रदेश उपाध्यत्र सुनील बागुल यांनी भाजपची साथ सोडत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सुनील बागुल हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक होते. पक्षांतर्गत नाराजीमुळे त्यांनी तेव्हा भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता. भाजपमध्ये जाऊन ते पुन्हा शिवसेनेत आले होते. आता पुन्हा ते भाजपमध्ये गेले.

भाजपमध्ये प्रवेश करणारे ठाकरे गटाचे नेते -

१) सुनिल बागुल ( शिवसेना उपनेते, उबाठा )

२) मामा राजवाड़े ( महानगर प्रमुख, उबाठा )

३) गणेश गीते ( मा. स्थायी समिति सभापती )

३) सचिन मराठे (उपजिल्हाप्रमुख, मा. नगरसेवक, उबाठा )

४) प्रशांत दिवे ( मा. नागरसेवक, उबाठा )

५) सिमा ताजने ( मा. नगरसेविका,उबाठा )

६) कमलेश बोडके ( मा. नगरसेवक )

७) बाळासाहेब पाठक ( जिल्हा संघटक, उबाठा )

८) गुलाब भोये ( उपजिल्हा प्रमुख, उबाठा )

९) कन्नु ताजने ( उपजिल्हा प्रमुख, उबाठा )

९) शंभु बागुल ( युवसेना विस्तारक, उबाठा )

१०) अजय बागुल ( श्रमिक सेना जिल्हा प्रमुख )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT