Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विदर्भात महाविकास आघाडीला मोठं खिंडार, सरपंच आणि पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

BJP Strengthens in Vidarbha: विदर्भात भाजपने महाविकास आघाडीला मोठा झटका दिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विदर्भात भाजपची ताकद आणखी वाढली आहे.

Priya More

Summary -

  • विदर्भात मविआला मोठा धक्का बसला आहे.

  • सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी मविआची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला

  • अमरावतीच्या चांदूरा आणि बुलडाण्याच्या मलकापूरमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी मविआची साथ सोडली.

  • भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

गणेश कवाडे, मुंबई

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विदर्भात मविआला खिंडार पडलं असून अनेक सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडत भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी विदर्भात भाजपची ताकद चांगलीच वाढली आहे. भापचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीमधील चांदूरा आणि बुलडाणामधील मलकापूर येथे महाविकास आघाडीला भाजपने मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला याठिकाणी मोठा धक्का बसला. चांदूरा आणि मलकापूर या दोन्ही तालुक्यातील सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी आज मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. भाजप आमदार चैनसुख संचेती यांच्या माध्यमातून मविआला धक्का देण्यात आला आहे. त्यांच्या माध्यमातून या सर्वांनी भाजपचे कमळ हाती घेतलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरुच आहे. त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.

रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, मलकापूर आणि चांदूर तालुक्यातील अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्या सर्वांचे स्वागत आहे. महायुतीचे सरकार राज्यात खूप चांगले काम करत आहे. सामान्य जनतेला सातत्याने प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेण्यात आले.' दरम्यान, याआधी मावळमध्ये मविआला धक्का बसला होता. मावळमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांमधील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंब्रातील गावदेवी बायपास येथे कंटेनरखाली येऊन ३ मुलांचा मृत्यू

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; सामान्य समजून लोकं करतात इग्नोर

Beed Cloudburst: बीडमध्ये अचानक ढगफुटी; 25-30 गावांचा संपर्क तुटला|VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार, ७ ते ८ वाहनं एकमेकांना धडकली; पाहा VIDEO

Devgad Fort History: सिंधुदुर्गच्या अरबी किनाऱ्यावर वसलेला देवगड किल्ला, जाणून घ्या वास्तूकलेचे इतिहास आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT