BIG POLITICAL SETBACK FOR BACHCHU KADU AS PRAHAR WORKERS JOIN THACKERAY CAMP saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: बच्चू कडूंना जबर धक्का! कार्यकर्त्यांनी बदलला 'भिडू'; शेकडो पदाधिकाऱ्यांचा ठाकरे सेनेत प्रवेश

Maharashtra Politics: बच्चू कडू यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षात नाराजीचं वातावरण आहे. पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी मातोश्री येथे शिवसेनेत (UBT) प्रवेश केला.

Bharat Jadhav

प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांना मोठा बसला आहे. बच्चू कडूंनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे नाराज झालेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी आपला भिडू बदलत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधणे यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे, आमदार डॉ. राहुल पाटील उपस्थित होते. (Uddhav Thackeray criticises Bachchu Kadu over political move)

यावेळी उद्धव ठाकरेंनी बच्चू कडू यांच्यावर घणाघाती प्रहार केला. बच्चू कडू यांना घरी बोलावून मंत्री बनवले ही माझीच चूक ठरली. लोभापायी ते गेले, पण कार्यकर्ते शिवसेनेसोबत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'मातोश्री' निवासस्थानी परभणीमधील प्रहार जनशक्ती संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी बच्चू कडूंचा समाचार घेतला.

आपल्यातून गेलेला माणूस जुना शिवसैनिक होता. त्याला मोठं करण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली, पण काही लोक सत्तेच्या आणि पदाच्या मोहात अडकले. जे लोभासाठी गेले त्यांना जाऊ द्या. बच्चू कडू यांनी राजकीय स्वार्थ साधला आहे, आम्ही त्यांच्या या निर्णयासोबत नाही. हा निर्णय घेताना त्यांनी कार्यकर्त्यांचा विचार केला नाही. स्वार्थासाठी कार्यकर्त्यांच्या भवितव्याचा बळी त्यांनी दिला आहे असा आरोप शिवलिंग बोधने काही दिवसापूर्वी केला होता.

बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या आमदारकीच्या लोभाने शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. आपल्या फसवलं गेलं अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. आज 'मातोश्री'वर शिवबंधन हाती बांधल्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी उघड केली.आम्हाला विकून बच्चू कडूंनी शिंदे गटात प्रवेश केला, आम्ही स्वाभिमानी असल्याने उद्धव ठाकरे यांच्यासोबत आलो आहोत, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. बच्चू कडू यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्या पक्षातील अनेक जिल्हाप्रमुख व पदाधिकारी प्रचंड नाराज आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नांदेड- कंधारच्या ग्रामीण रुग्णालयात उंदरांचा सुळसुळाट

Swelling : हातापायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करू नका, 'या' गंभीर आजाराचे असू शकते लक्षण

Polymer Notes : १० आणि २० रुपयांच्या नोटांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १०० कोटी नोटांबाबत संसदेत केली 'ही' घोषणा

टाटा ग्रुपमध्ये मोठी उलथापालथ! एन.चंद्रशेखरन यांचा तडकाफडकी राजीनामा; कॉर्पोरेट जगतात खळबळ

मऊ, खुसखुशीत रूमाली रोटी घरी कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT