NCP Muslim leader reportedly in touch with BJP Maharashtra saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अजित पवार गटाला मोठा धक्का; राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या गळाला, चर्चांना उधाण

Mahayuti Tensions Rise: अजित पवार गटातील एका बड्या राष्ट्रवादी नेत्याच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. हा नेता भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात असून पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील राजकीय स्पर्धेला वेग आला आहे.

Bharat Jadhav

  • राष्ट्रवादीतील एका बड्या नेत्याच्या भाजप प्रवेशाची राजकीय चर्चा सुरू आहे.

  • राष्ट्रवादीतील महत्त्वाचा मुस्लिम चेहरा भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

  • आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

राज्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पडघम वाजू लागलेत. या निवडणुकीसाठी भाजप, सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी, शिंदे गटाने जोरदार प्रयत्न सुरू केलेत. त्याचदरम्यान महायुतीमधील तिन्ही पक्षांमधील संघर्ष सुरू झालाय. राज्यातील अनेक महापालिकांमध्ये महायुतीची सत्ता असूनही त्यांच्यात अंतर्गत वाद सुरू झालेत. दुसरीकडे तिन्ही पक्ष एकमेकांची नेते फोडू लागल्याची चर्चा असतानाच अजित पवार गटातील बडा नेत्या भाजपच्या संपर्कात असून लवकरच राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीमधील गटातील मुस्लिम चेहरा हाती कमळ घेणार असल्याचं म्हटलं जातंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाचे संचालक सलीम सारंग हे भाजपवासी होणार असल्याची चर्चा सुरू झालीय. सारंग यांच्या नुकत्याच झालेल्या एका पॉडकास्टमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह ते भाजपसोबत राहून मुस्लिम समाजासाठी केलेल्या कामांपर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलंय.

भाजपच्या काही नेत्यांकडून मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह किंवा द्वेषपूर्ण वक्तव्य केली जात असली, गेल्या ६५ वर्षांत देशात कोणाची सत्ता होती? भाजपला सत्तेत येऊन अवघी १५ वर्षे झाली आहेत,” असा सवाल करत सलीम सारंग यांनी भाजपची बाजू मांडली. SIR सर्वेच्या मुद्द्यावर बोलताना “आमच्या पूर्वजांचं या मातीत जास्त रक्त सांडलं आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा आमच्याकडे कुठे जायचं याचा पर्याय होता, पण आम्ही भारतात राहणं पसंत केलं,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

विशेष म्हणजे, भाजप सत्तेत आल्यानंतर कागदपत्रांच्या मुद्द्यावरून एकाही मुस्लिम नागरिकाला देशाबाहेर पाठवण्यात आलेलं नाही, उलट सर्वांची कायदेशीर कागदपत्रं तयार करून देण्यात आली, असा दावा त्यांनी केला. “भाजप मुसलमानांच्या सपोर्टची पार्टी बनलीय, त्यांच्या या वक्तव्यामुळे ते लवकरच भाजपवासी होणार असल्याचं म्हटलं जातंय.

अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर भाजपमध्ये राहून मुस्लिम समाजासाठी कशा पद्धतीने काम करण्यात आलं, याचाही त्यांनी उल्लेख केला. मदरशांमध्ये आधुनिक शिक्षणासाठी दहा लाख रुपयांच्या फंडिंगची सुरुवात केल्याच ते म्हणाले. याच मुलाखतीत सलीम सारंग यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणावरही भाष्य केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मॅडम, तुम्ही.....सरकार येऊ द्या, तुम्हाला...; बड्या नेत्याचे महिलेसोबतचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

मध्यभागी मनोज जरांगेंचा ताफा; रस्त्याच्या दोन्ही बाजुला नागरिकांची तुफान गर्दी; चौकात पाय ठेवलायलाही जागा नाही, पाहा फोटोज

2 हजारांवरील UPI पेमेंटसाठी शुल्क लागणार? अमेरिकेच्या दबावामुळे UPIवर शुल्काची तयारी

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बीडमध्ये दाखल

पाकिस्तानातही गणपती बाप्पा मोरया, कराचीत मराठी माणसाच्या बाप्पाची चर्चा

SCROLL FOR NEXT