Maharashtra Politics News:  Saamtv
महाराष्ट्र

Bhavana Gawali News: 'CM शिंदेंसह पक्षावर दबाव, अशा स्क्रिप्ट हिताच्या नसतात..' राजश्री पाटलांच्या पराभवानंतर भावना गवळी थेट बोलल्या!

Maharashtra Politics News: "एकनाथ शिंदे आणि आमच्या पक्षावर वेगवेगळ्या मार्गाने प्रेशर होते. हेमंत पाटील यांनी सुद्धा मान्य केलं होतं की ही स्क्रिप्ट लिहिली गेली आहे," असे भावना गवळी म्हणाल्या.

Gangappa Pujari

मनोज जयस्वाल| यवतमाळ, ता. ६ जून २०२४

यवतमाळ- वाशिम लोकसभेच्या उमेदवार राजश्री पाटील यांना पराभव स्विकारावा लागला. पाच वेळेच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांचे तिकीट कापून राजश्री पाटील यांना संधी देण्यात आली होती. त्यानंतरही लाजिरवाणा पराभव स्विकारावा लागल्याने शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावरुनच आता भावना गवळी यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेवरुन सवाल उपस्थित केला आहे.

काय म्हणाल्या भावना गवळी?

"जनतेने मनामध्ये काही वेगळे ठरवलं असल्याचं दिसून येत आहे. यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघाची जनता पंचवीस वर्षापासून मला खासदार म्हणून बघते मी केलेली काम जिव्हाळ्याचे संबंध यामुळे मी 25 वर्ष खासदार म्हणून काम पाहिले. महाराष्ट्रात जे चित्र निर्माण झालं जे निकाल लागले त्याचाच हा एक भाग असू शकतो," असे भावना गवळी म्हणाल्या.

तसेच "जनतेची इच्छा पक्षश्रेष्ठींकडून पूर्ण झाली नाही, म्हणून जनतेने मताच्या रूपाने दाखवली. सत्य हे कडव असतं मात्र ते बोललं पाहिजे. एकनाथ शिंदे आणि आमच्या पक्षावर वेगवेगळ्या मार्गाने प्रेशर होते. हेमंत पाटील यांनी सुद्धा मान्य केलं होतं की ही स्क्रिप्ट लिहिली गेली आहे.मात्र, अशा स्क्रिप्ट लिहिल्या जातात तेव्हा त्या पक्षाच्या हिताच्या नसतात," असे भावना गवळी म्हणाल्या.

"मुख्यमंत्र्यांची मला उमेदवारी देण्याची तळमळ होती. मात्र त्यामध्ये अनेक फॅक्टर झालेत. मी शिवसेनेचे काम करते आहे आणि संपूर्ण विदर्भामध्ये चांगलं काम करत राहील. हार जीत होत असते, खापर फोडून काही निष्पन्न होणार नाही, कुणालाही दोष देऊन काही होणार नाही," असेही भावना गवळी म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA Sandip Joshi : "आमदार जोशींसोबत माझी ओळख... " आमदारांच्या नावाखाली नोकरीचं आमिष दाखवत लाखोंचा गंडा

Kidney stone symptoms: 'ही' लक्षणं दिसत असतील समजा किडनीमध्ये झालेत स्टोन; शरीरातील बदल ओळखून वेळीच उपचार करा

Maharashtra Live News Update: सोलापूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग

8th Pay Commission: ToR आहे तरी काय? ज्यामुळे लागू होतो आठवा वेतन आयोग, तुमचा पगार किती वाढणार? वाचा सविस्तर

Kondura Beach : येणारा मोठा वीकेंड सिंधुदुर्गला प्लान करा; 'कोंडुरा' बीचचं सौंदर्य पाहून मालदीव,थायलंड विसराल

SCROLL FOR NEXT