Bacchu Kadu Reaction On Kokate Statement Saam tv
महाराष्ट्र

Bacchu Kadu: कोकाटेंना कोणी निवडून दिलं, कोणी मंत्री केलं? कृषीमंत्र्याच्या विधानानंतर बच्चू कडू संतापले

Bacchu Kadu Reaction On Kokate Statement: शेतकरी नेते बच्चू कडू यांनी कृषीमंत्र्यांच्या विधानावर संताप व्यक्त केलाय. अर्थमंत्री पक्षाचे नेते अजित पवार आहेत. भिकाऱ्याचा अवस्थेत कोण आहे? शासनातील मंत्रीच भिकारी म्हणत असले तर आता स्पष्ट झालंय,असं बच्चू कडू म्हणालेत.

Bharat Jadhav

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

माणिकराव कोकाटे यांनी सरकारला भिकारी म्हटलं, त्यामुळे ही वास्तविकता असावी. पण या भिकारीच्या रांगेत कोण आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व सरकार या रांगेत आहेत. माणिकराव कोकाटे यांनी कृषी विभागाची वास्तविकता मांडलीय. तर रम्मी खेळामुळे किती लोकांचे बळी गेलेत, असा सणसणीत सवाल प्रहार शेतकरी संघटनेचं प्रमुख बच्चू कडू यांनी केलाय.

राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं. सरकार भिकारी आहे, असं विधान कोकाटे यांनी केलं, त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर टीकेची राळ उठलीय. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनीही कृषीमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल चढवलाय. कृषी खात्याला पैसे मागून मागून थकले. गृहखात, जलसंपदा खाते मोठे आहे. तर कृषी खाते फक्त 9000 कोटीचं आहे. कोकाटे यांचे विधान हे फार मोठं आहे. पण हे विधान करून त्यांनी एकप्रकारे मुख्यमंत्र्यांना शिवी दिली, असं बच्चू कडू म्हणाले.

माणिकराव कोकाटे पहिल्यांदा खरं बोलले, त्यामुळे त्यांचे आभार मानले पाहिजेत. सरकारजवळ पैसा कमी आहे, म्हणून ते रमी खेळत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, पैसे नाही पण शक्तिपीठ महामार्ग, मेट्रो सुरू करायला कोणी सांगितलं होतं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुष्काळाची वाट पाहून कर्जमाफी करण्याचा विधान करत असतील तर, वाईट गोष्ट आहे, असे बच्चू कडू प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

शेतीमालाला भाव नव्हता म्हणून आम्ही कर्जमाफी मागत आहोत. माणिकराव कोकाटे यांची फजिती झाली. भीक मागितल्याशिवाय पर्याय नसल्यामुळे ते भीक मागत आहेत. माणिकराव कोकाटे बेताल वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना सरकार कसं काय पचवून घेतं हे माहिती नाही. त्यांनी सरकारला भिकारी म्हटलं आहे. त्यामुळे तुमच्या आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालाय. सरकार भिकारी म्हणजे राज्य भिकारी. यामुळे माणिकराव यांनी एका शब्दात राज्याची गरिमा काढलीय, अशी टीका बच्चू कडू यांनी केलीय.

दरम्यान काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर प्रतिक्रिया देतांना बच्चू कडू यांनी सरकारवर टीका केलीय. या रमी खेळामुळे किती लोक देशोधडीला लागलेत. इतक्या मोठ्या आज प्रमाणात आत्महत्या होऊन तो खेळ का बंद होत नाही.

क्रिकेटर सिनेस्टार हे जाहिराती करतात, त्यांना लाज का वाटत नाही. हे जाहिरात करणारे भिकारचोटा पेक्षाही भिकारचोट आहेत. निधीच नाही असे माणिकराव कोकाटे बोलले आहेत. अर्थमंत्री पक्षाचे नेते अजित पवार आहेत. भिकाऱ्याचा अवस्थेत कोण आहे. शासनातील मंत्रीच भिकारी म्हणत असले तर आता स्पष्ट झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT