NCP Leader Hasan Mushrif Resignation  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: धनंजय मुंडेंनंतर राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या मंत्र्याचा तडकाफडकी राजीनामा

NCP Leader Hasan Mushrif Resignation : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील आणखी एका बड्या मंत्र्याने तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

Bharat Jadhav

महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या काही दिवसांपासून अडचणीत आलाय.नेत्यावरील आरोपांमुळे अजित पवार गट अडचणीत आलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाले. तर शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे देखील अडचणींत सापडलेत.

संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. त्याचदरम्यान अजित पवार गटातील अजून एका मंत्र्याने राजीनामा दिलाय.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिलाय. पालकमंत्री पदाचे वाटप होताना वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हसन मुश्रीफ यांना देण्यात आलं.

मुश्रीफ हे मूळचे कोल्हापूरमधील कागल येथील असल्याने त्यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदासाठी त्यांनी सेटिंग लावली होती. मात्र त्यांना कोल्हापूरसोडून ६०० किलोमीटर अंतरावरील वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय. पण यावर ते नाराज होते. हसन मुश्रीफ यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. तेव्हापासून ते भाजपसह आपल्याच पक्षश्रेष्ठींविरोधात नाराज होते. नाराजी उफाळून आल्याचं बोललं जातंय, हसन मुश्रीफ यांनी वाशीमच्या पालकमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: हनी ट्रॅपचा मुद्दा गाजत असतानाच खडसेंनी पत्रकार परिषदेतच महाजनांचा तो व्हिडिओ लावला | VIDEO

Congress Leader Dies : काँग्रेस नेत्याचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; राजकीय वर्तुळात हळहळ

Atal Setu : आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास, 'अटल सेतू'मुळे सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींची भर

Digestion Tips: पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी झोपण्यापूर्वी नक्की करा 'हे' उपाय

Bhagavad Gita: भगवद्गीतेचा सहावा अध्याय कोणती शिकवण देतो?

SCROLL FOR NEXT