Minister Uday Samant announces possible defection of Thackeray loyalists to Shinde Sena in Amravati  saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शिंदे सेनेचा दे धक्का! अमरावतीमधील शिलेदार सोडणार उद्धव ठाकरेंची साथ

Amravati Politics: पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पार्श्वभूमीवर पक्षांकडून मोर्चोबांधणी केली जात आहे. अनेक ठिकाणी पक्ष प्रवेश करून घेत राजकीय पक्ष आपली ताकद वाढवत असतात. शिंदे गट पु्न्हा एकदा ठाकरे गटाला धक्का देणार आहे.

Bharat Jadhav

  • अमरावतीत आज शिंदे गटाचा विभागीय मेळावा आयोजित.

  • ठाकरे गटातील काही नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटात जाण्याची शक्यता.

  • आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी राजकीय घडामोडींना वेग.

  • मंत्री उदय सामंत यांनी मोठा बदल होणार असल्याचा दावा केला.

शिंदे गट पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहे. अनेक जिल्ह्यातील ठाकरेंचे कार्यकर्ते आणि नेते मशाल सोडत हाती धनुष्यबाण घेत आहेत. अमरावतीमधील उद्धव ठाकरेंचे शिलेदारही ठाकरेंची साथ सोडणार आहेत. आज अमरावतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचा विभागीय मेळावा होणार आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील काही पदाधिकारी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबतची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिलीय.

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी घडामोडींना वेग आलाय. आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटातील अनेक दिग्गज नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. आता सामंत यांच्या दाव्यानुसार आज मोठा धक्का शिवसेना ठाकरे गटाला बसू शकतो.

आज अमरावतीमध्ये आज शिवसेना शिंदे गटाचा विभागीय मेळावा होतोय. या मेळाव्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्री संजय राठोड, मंत्री उदय सामंत यांची उपस्थितीत आहेत. बुलढाण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील काही पदाधिकारी आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. तसेच अमरावतीच्या मेळाव्यातही काही ठाकरेंचे शिलेदार आमच्या पक्षात येणार असल्याची माहिती, उदय सामंत यांनी दिलीय.

एकनाथ शिंदेंची ताकद वाढणार

अमळनेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. शिरीष चौधरी यांनी अमळनेरमधून विधानसभा मतदारसघांतून अपक्ष निवडून आले होते.भाजपचे माजी नगरसेवक आणि सरपंच अशा एकूण ४००-५०० कार्यकर्त्यांसह माजी आमदार शिरीष चौधरी शिवेसेनेत प्रवेश करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: पौर्णिमा तिथीच्या पवित्र योगात या राशी चमकणार! जाणून घ्या आजचं सविस्तर पंचांग आणि शुभ मुहूर्त

Maharashtra Live News Update : निधी वाटपावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये तीव्र नाराजी - सुत्र

Budh Gochar 2025: राहूच्या नक्षत्रात आज होणार बुध ग्रहाचं नक्षत्र गोचर; 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी

Chandrapur Farmer: शेतीच्या फेरफारासाठी 2 वर्षे टाळाटाळ; तहसील कार्यालयातच शेतकऱ्यानं घेतला टोकाचा निर्णय

Crime News: नवऱ्याला चारित्र्याचा संशय; वाट अडवून भररस्त्यात बायकोसोबत केलं भयानक कृत्य

SCROLL FOR NEXT