Raj-Uddhav Thackeray Alliance saam Tv
महाराष्ट्र

Raj-Uddhav Thackeray Yuti: राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती होणार; वर्धापन दिनाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे संकेत

Raj-Uddhav Thackeray Alliance: शिवसेनाच्या (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) ५९व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरेंनी मनसे सोबतच्या युती करणार असल्याचे संकेत दिलेत.

Bharat Jadhav

शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होण्याबाबतची बातम्या येत आहेत. त्यावरून आज उद्धव ठाकरेंनी सुचक विधान केलंय. ५९व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलतांना उद्धव ठाकरेंनी मनसेच्या युती करू असे संकेत दिलेत. त्यासोबत त्यांनी भाजपला गंभीर इशारा दिलाय.

एका वाहिनीच्या मुलाखतीत बोलताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याबाबत सुचक विधान केलं होतं. राज ठाकरेंच्या युतीबाबतच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंनी अटीसह सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान आज शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे युती करण्याच्या आणखी एक पाऊल पुढे आले आहेत.

जे जनतेच्या मनात आहे, तेच आपण करणार असल्याचं विधान करत आपण राज ठाकरेंसोबत युती करण्यात तयार असल्याचे संकेत उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.

दरम्यान दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यावरून वेगळीच चर्चा सुरू झाली होती. आज मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांच्या भेटीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केलीय. पण ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून शेठजींच्या नोकरांना वाटतं.

पण आमचं काय ते आम्ही बघून घेऊ, अशी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलीय. जे राज्याच्या मनात आहे तेच करेन , असं मनसेच्या युती संदर्भात उद्धव ठाकरे म्हणालेत. ठाकरे ब्रँड पुसायला निघालात तर भाजपला पुसून टाकून असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिलाय.

ठाकरेंचा नितेश राणेंवर घणाघात

५९व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी विरोधकांसह राणे कुटुंबावर जोरदार टीका केली आहे. 'माझं हिंदूत्व हे राष्ट्रीयत्व आहे. मात्र भाजपचं वेगळेच सुरू आहे. 'बटेंगे तो कटेंगे, म्हणतात आणि मराठी- माणसाचे मराठी माणसांमध्ये भांडण लावतात. परत हिंदू- मुस्लीम भांडण आहेच. त्या भाजपचा एक बेडूक ओरडतोय, त्याला ते एकच काम दिलंय.

यावेळी उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंवर शारीरिक व्यंगावर टीका केली. तुझी उंची केवढी, तुझा आवाज कसा. उंची पेग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा, डोळे कुणासारखे माहिती नाही.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंवर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Russia-Ukraine Tension: रशिया युक्रेन युद्ध पुन्हा सुरु, रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला

Mumbai Dadar Fire: दादर रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधील वाहनांना आग; 12 वाहने जळून खाक

Ganesh Mandap: गणेश मंडपात पुजाऱ्यासोबत चमत्कार? बेशुद्ध पडलेला पुजारी थेट उठून बसला?

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचं श्रेय फडणवीसांचं, राऊतांनी गायलं फडणवीसांचं गुणगान

Maharashtra Live News Update: दादरमध्ये रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधील वाहनांना लागली आग, १० ते १२ वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी

SCROLL FOR NEXT