
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचा ५९वा वर्धापनदिन सोहळा षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडत आहे. या कार्यक्रमामध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या आक्रमक भाषण शैलीत विरोधकांवर हल्लाबोल केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या भाषेत विरोधकांचे वाभाडे काढले आहेत. ते म्हणाले की, 'तुमच्याशी काय बोलायचं हा प्रश्न मला पडलंय. हे वातावरण जे आहे, ते वातावरण मला नाही वाटत की कुणाच्या नशिबात, भाग्यात असं प्रेम लिहिलं असेल. अर्थात ही माझी पुण्याई नाही, ही माझ्या पूर्वजांची पुण्याई आणि तुमच्या सगळ्यांचं अतोनात प्रेम...मी यापुढे भाषण केलं नाही आणि तुमचा जयघोष सुरु झाला.'
'हा जयघोष नुसता विरोधकांनी पाहिला तरी, त्यांचे नॅपकीनसह सगळे कपडे ओले होतील. त्यांना एक प्रश्न पडेल की एवढं सगळं केलं. माणसे फोडली, पक्ष फोडला, चिन्ह चोरली तरी उद्धव ठाकरे संपत कसा नाही. कारण त्यांना कल्पना नाही की शिवसेना प्रमुखांनी रक्त आटवून, विचार पेरून शिवसेना नावाचं वादळ निर्माण केलं आहे. पैसे फेकून जमवलेली माणसे नाहीत. विचार अंगात भिनवून, कट्टर हिंदूनिष्ठ आणि महाराष्ट्र धर्म पाळणारे शिवसैनिक आहेत,' असा जोरदार हल्लाबोल ठाकरेंनी विरोधकांवर केला आहे.
एकदाच काय ते होऊ द्या
शिवसेना आजही तरूण आहे. नेहमी तरूणच राहणार आहे. पहिला मेळावा हा शीवतीर्थावर झाला होता. शिवाजी पार्क भरलं होतं. आता पैसा फेको तमाशा देखो, असा आता चोरांचा बाजार आहे, तसं काही नव्हतं. एकदम शिवाजी पार्कात सभा घेण्याचा मोठेपणा करू नका. त्यावेळी शिवसेना प्रमुख म्हणाले की एकदाच काय ते होऊ द्या. शिवाजी पार्क तुडुंब भरलं होतं.
दाढी फुटली आणि दाढी खाजवतात ते त्यावेळी कुठे असतील याची कल्पना नाही. आज सगळीकडे बॅनर, पोस्टर लागलेत. शिवसेनाप्रमुखांचे फोटो आहेत, त्यांची कीव होते. बाप बदलतात. तुला राजकारणात पोरं होत नाहीत, त्याला आम्ही काय करू... आमच्याकडे आहेत घ्यायची ती घे.. किती पाहिजेत. भाजप असाच पक्ष आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.