Ajit Pawar- Anjali Damania Saam TV
महाराष्ट्र

Anjali Damania News:'दिवाळीत पुन्हा भूकंप, अजित पवार शांत बसणार नाहीत...' अंजली दमानियांच्या दाव्याने खळबळ

Anjali Damania On Sharad Pawar: शरद पवार हे त्यांच्या बोलण्यावर ठाम राहिले असते तर सगळ्यांना आनंद झाला असता, असेही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

Gangappa Pujari

Anjali Damania On Ajit Pawar: राष्ट्रवादी (NCP) कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा परत घेतला आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले होते. शरद पवार यांच्या राजीनामा नाट्याने अजित पवार यांची कोंडी झाल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

मात्र अजित पवार यांचं बंड अजूनही थांबलेलं आहे असं वाटत नाही, म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नवा दावा केला आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

काय आहे अंजली दमानिया यांचा दावा...

'अजित पवार (Ajit Pawar) भरपूर काम करतात. भ्रष्टाचारही करतात. त्याविरोधात मी लढलेही आहे. अजित पवार यांची आता ना घर का ना घाटका अशी परिस्थिती झाली आहे. ते शांत बसतील असं मला वाटत नाही, असा दावा अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला आहे.

तसेच येत्या काही दिवसात, महिन्यात म्हणजे दिवाळीपर्यंत ते पुन्हा काही दगाफटका करतील यात शंका नाही, असे भाकितही अंजली दमानिया यांनी वर्तवले आहे. दमानिया यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) खळबळ उडाली आहे.

शरद पवार सत्ता सोडणार नाहीत...

अंजली दमानिया यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राजीनाम्यावरुनही मोठे वक्तव्य केले आहे. याबद्दल बोलताना "शरद पवार हे त्यांच्या बोलण्यावर ठाम राहिले असते तर सगळ्यांना आनंद झाला असता. त्यांनी राजीनामा दिला होता. त्यावर ठाम राहायला हवं होतं. पण ते शरद पवार आहेत. ते शेवटपर्यंत सत्ता सोडणार नाहीत. शेवटपर्यंत पद सोडणार नाहीत," असे त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ठराव पास, तटकरेंची महत्वाची भूमिका; सूनेत्रा पवारांना कोणती मोठी जबाबदारी मिळाली?

Bombil Fry Recipe: कोकणची अस्सल चव, कुरकुरीत बोंबील फ्राय कसे बनवायचे?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात शपथविधी

Royal Enfield Classic 350: किराण्याच्या बजेटमध्ये दारी येईन Royal Enfield,जाणून घ्या EMIचे गणित

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार! २५ वर्षीय तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT