Ajit Pawar Jayant Patil x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : जयंत पाटील तुमच्या पक्षात येणार का? अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Political News : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील त्यांच्या पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चर्चांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे.

Yash Shirke

Ajit Pawar on Jayant Patil Resignation: जयंत पाटील सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पाटील यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची वर्णी लागणार असल्याचे म्हटले जात आहे. जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची चर्चा जितेंद्र आव्हाड यांनी खोडून काढली असली, तरी शशिकांत शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटले जात आहे.

जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना काही प्रश्न विचारण्यात आले. सुरु असलेल्या चर्चांवर 'तो त्यांचा पक्ष आहे, त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे', असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.

जयंत पाटील तुमच्यासोबत येणार का? असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर 'जयंत पाटील हे वरिष्ठ नेते आहेत. आम्ही एकत्र काम देखील केले आहे. आमच्या आमदारकीची आता आठवी टर्म सुरु आहे. इतकी वर्ष एकत्र काम केल्याने आमचे संबंध आहेत. पण जयंत पाटील आणि माझी राजकीय भूमिका वेगळी आहे', असे उत्तर अजित पवार यांनी दिले.

'जयंत पाटील यांनी राजीनामा कोणत्या कारणामुळे दिला किंवा ते राजीनामा देण्याच्या तयारीत का आहेत हे मला माहीत नाही. याबाबत विचारण्याचा मला अधिकारही नाही. अधिवेशनात भेटले, तर सहज त्यांना विचारेन. ते मागील ६-७ वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष आहेत. अन्य पदाधिकाऱ्यांना संधी देऊन त्यांना कदाचित राष्ट्रीय पातळीवर काम करायचे असेल', असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimples And Digestion: चेहरा पिम्पल्सने भरलाय? हे असू शकतं कारण, वाचा एक्सपर्ट्स काय सांगतात

Vastu Tips Of Tulas: तुळशीचे पान तुमच्या पर्समध्ये ठेवा, मिळेल धनसंपत्ती

Maharashtra Live News Update :जयंत पाटलांनी राजीनामा दिलेला नाही- सुप्रिया सुळे

SBI Recruitment: स्टेट बँकेत नोकरी अन् १ कोटींचं पॅकेज; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Politics News: ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचा दे धक्का; तीन महत्वाच्या शिलेदारांचा जय महाराष्ट्र

SCROLL FOR NEXT