Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ...तिथे स्वबळावर लढणार, अजित पवारांच्या नेत्याचं मोठं वक्तव्य; महायुतीचा प्लान ठरला

Maharashtra Political News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुती एकत्र लढणार की स्वबळावर स्वतंत्रपणे लढणार या प्रश्नाचे उत्तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे.

Yash Shirke

Maharashtra :आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात होणार आहे. दिवाळीमध्ये जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पालिका अशा पहिल्या टप्प्यातील निवडणुका होतील असे म्हटले जात आहे. यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका पूर्ण होणार आहेत. यानुसार पक्षांनी कामाला सुरुवात केली आहे.

राज्यातील आगामी निवडणुका महायुती एकत्र लढणार की स्वतंत्रपणे लढणार हा प्रश्न अनेकदा विचारला जात आहे. राज्यात विविध ठिकाणी स्वबळाचा नारा दिला जात आहे. मुंबई, ठाणे या ठिकाणी शिंदे गट; पुणे, पिंपरी चिंचवड येथे अजित पवार गट स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसऱ्या बाजूला, भाजपमध्येही स्वतंत्रपणे निवडणूक लढवूया असा सूर उमटला जात आहे.

या एकूण परिस्थितीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आगामी निवडणुकीच्या तयारीला आम्ही सुरुवात केली आहे. आम्ही (महायुती) एकत्रच लढणार आहोत. पण जमेल तेथे महायुती आणि जमेल तेथे स्वबळावर लढणार असे वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. मागील चारही निवडणुकांत ही जागा राष्ट्रवादीनेच लढवली असून गेल्या वेळी विजय मिळवला आहे. यंदा भैय्या माने हे उमेदवार असतील आणि ते नक्कीच विजयी होतील असा विश्वासही हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. तरीही तिन्ही पक्षांचे नेते ही जागा कोणाला द्यायची हे ठरवतील, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar: मोठी कारवाई! महिला महसूल अधिकाऱ्याला अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं

१००० अनधिकृत चाळी, ६००कोटींची उलाढाल; चाळ माफिया आणि अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?

Maharashtra News Live Update: वादळी वाऱ्याचा फटका; छत्रपती संभाजीनगर विमानतळाचे छप्पर कोसळले, मोठी दुर्घटना टळली

काय वेळ आलीय! पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त, कॅनमध्ये डिझेल देण्यास आजपासून बंदी, VIDEO

Mumbai Crime News: किरकोळ कारणावरून जोडप्यात वाजलं; वादातून पतीनं पत्नीच्या पोटात लाथ मारली अन्... होत्याचं नव्हतं झालं

SCROLL FOR NEXT