ajit pawar x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याकडे तक्रार, अजित पवारांच्या नेत्याला अखेर अटक

Maharashtra Political News : अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या विनोद देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. तीन वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्यात देशमुख यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

Yash Shirke

Maharashtra : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याचे जवळचे सहकारी असलेले विनोद देशमुख यांना जळगाव पोलिसांनी अटक केली आहे. देशमुख यांनी जळगावच्या एका व्यावसायिकाच्या ऑफिसमध्ये जबरदस्तीने घुसून त्या व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी २०२२ मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मनोज वाणी या व्यावसायिकाने विनोद देशमुख यांच्या विरोधात २०२२ मध्ये तक्रार दाखल केली होती. वाणी यांच्या कार्यालयावर हल्ला करणे, त्यांना जीवे मारण्याची धमकी देणे अशा गंभीर गुन्ह्यांचा आरोप देशमुख यांच्यावर होता. विनोद देशमुख हे मागील ३ वर्षांपासून फरार होते. त्यांना रामानंदनगर पोलिसांनी अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, विनोद देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय नेता आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देशमुख निकटवर्तीय असल्याचेही म्हटले जात आहे. यामुळेच त्यांची अटक लांबणीवर होती अशीही चर्चा आहे. हल्ला प्रकरणी व्यापारी मनोज वाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. पोलीस दबावाखाली वागत असल्याचा आणि जाणूनबुजून विनोद देखमुख यांची अटक रोखत असल्याचा वाणी यांनी आरोप केला होता.

उद्योजक मनोज वाणी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. राजकीय दबावामुळे प्रशासन देशमुख यांच्यावर कारवाई टाळत असल्याचा आरोप वाणी यांनी केली. पत्रकार परिषदेनंतर जळगाव पोलिसांनी विनोद देशमुख यांना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT