Vasant Deshmukh Bail saam tv
महाराष्ट्र

Vasant Deshmukh: जयश्री थोरातांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना जामीन

Vasant Deshmukh Bail: रविवारी पुण्यातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वसंत देशमुख यांना अटक केली होती. जयश्री थोरात यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं त्यांना चांगलेच महागात पडले.

Priya More

सुशील थोरात, अहमदनगर

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत भाजपचे नेते वसंत देशमुख यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी वसंत देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्यांना अटक केली होती. पण वसंत देशमुख यांना आज जामीन मिळाला. संगमनेर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. रविवारी पुण्यातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वसंत देशमुख यांना अटक केली होती. जयश्री थोरात यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं त्यांना चांगलेच महागात पडले.

संगमनेरचे पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी सांगितले की, वसंत देशमुख यांची तब्येत बिघडल्यानंतर आणि बायपास झालेले असल्याने त्यांची संगमनेर येथे प्राथमिक तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना नाशिकच्या रुग्णालयात रेफर केले आहे. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी अतिरिक्त पोलिस अधिक्षक कार्यालयात नेण्यात आले.'

अहमदनगरच्या धांदरफळ येथील सभेत वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर अहमदनगरमध्ये तणावाचे वातावरण निर्णाण झाले. अहमदनगरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन, जाळपोळ, तोडफोड केली. वसंत देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध करत राज्यभरतातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. यावरून वसंत देशमुखांसह सुजय विखे- पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील आणि भाजपचा निषेध केला जात आहे.

अहमदनगरमध्ये सध्या हाय व्होल्टेज राजकीय घडामोडी घडत आहेत. याठिकाणी सध्या विखे-पाटील आणि थोरात कुटुंबीयांमध्ये आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. या घटनेनंतर सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना मला जीवे मारण्याचा कट त्यांनी रचला असल्याचा आरोप केला होता. तर जयश्री थोरात यांनी कारवाईची मागणी करत त्यांच्यावर आणि कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT