Maharashtra Politics: पक्षाने सांगितलं तसं ऐकलं, पण आता....; अहमदनगरमध्ये कदम परिवार भाजपची साथ सोडणार

rahuri assembly constituency: राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डीले यांना उमेदवारी दिल्यामुळे कदम परिवार नाराज झाला आहे. कदम परिवाराने भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra Politics: पक्षाने सांगितलं तसं ऐकलं, पण आता....; अहमदनगरमध्ये कदम परिवार भाजपची साथ सोडणार
rahuri assembly constituency saam tv
Published On

सुशील थोरात, अहमदनगर

भाजपने पहिली उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या उमेदवारी यादीनंतर भाजपमधील अनेक जण नाराज झाले आहेत. हे नाराजी नाट्य कालपासून सुरू आहे. अनेकांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर काही जण पक्ष सोडण्यावर ठाम आहेत. अशामध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डीले यांना उमेदवारी दिल्यामुळे कदम परिवार नाराज झाला आहे. कदम परिवाराने भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून भाजपात असलेला कदम परीवार तिकीट न मिळाल्याने नाराज झाला आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डीले यांना उमेदवारी जाहिर झाल्याने भाजपाचे इच्छूक उमेदवार सत्यजित कदम आणि त्यांचे वडील माजी आमदार चंद्रशेखर कदम भाजपविरोधात बंडाचे निशाण फडकवण्याची शक्यता आहे. अनेकदा पक्षाचा आदेश मानून निवडणुकीतून माघार घेतली होती. मात्र आता कार्यकर्ते जे सांगतील त्यानुसार निर्णय घेणार असल्याचे सत्यजित कदम यांनी सांगितले आहे.

Maharashtra Politics: पक्षाने सांगितलं तसं ऐकलं, पण आता....; अहमदनगरमध्ये कदम परिवार भाजपची साथ सोडणार
Maharashtra Politics : ठाकरे-काँग्रेसचा वाद पवारांनी मिटवला, जागावाटपावर एकमत, याद्या जाहीर होणार!

गेल्या अनेक दशकांपासून भाजप आणि संघाचे एकनिष्ठ असलेले माजी आमदार चंद्रशेखर कदम हे पुन्हा एकदा शिवाजी कर्डीलेंना उमेदवारी दिल्याने नाराज झाले आहेत. २०१९ ला देखील चंद्रशेखर कदम यांनी आपला मुलगा सत्यजित यांच्यासाठी पक्षाकडे राहुरी विधानसभेची मागणी केली होती. मात्र पक्षाने त्यांना सबुरीचा सल्ला देत शिवाजी कर्डिले यांनी उमेदवारी दिली. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरे यांच्याविरोधात कर्डिले यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

आता देखील देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली मात्र पुन्हा एकदा भाजपने उमेदवारीची माळ कर्डिले यांच्या गळ्यात टाकल्याने कदम पिता - पुत्र नाराज आहेत. कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आपण राहणार सांगितल्याने कदम हे भाजप विरोधात दंड थोपटण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics: पक्षाने सांगितलं तसं ऐकलं, पण आता....; अहमदनगरमध्ये कदम परिवार भाजपची साथ सोडणार
Maharashtra Politics: पक्षाने सांगितलं तसं ऐकलं, पण आता....; अहमदनगरमध्ये कदम परिवार भाजपची साथ सोडणार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com