ARVIND SAWANT REVEALS THACKERAY CAMP'S LEGAL PLAN AFTER 6 MPS LEFT THE PARTY saam tv
महाराष्ट्र

६ खासदारांनी साथ सोडली, आता पुढे काय कारवाई करणार? अरविंद सावंतांनी सांगितला सगळा प्लॅन

Thackeray Group Action Plan : ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यानंतर पक्षाने मोठी कायदेशीर रणनीती आखली आहे. अरविंद सावंत आणि संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत पुढील कारवाईचा प्लॅन सांगितला.

Bharat Jadhav

  • फुटीर खासदारांवर ठाकरे गटाची कायदेशीर कारवाई

  • ऑपरेशन टायगरनंतर ठाकरे गटाचा प्लॅन

  • संजय राऊतांचा गद्दार खासदारांना इशारा

एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर राबवत ठाकरेंचे ५ ते ६ खासदार फोडल्याचा दावा केला जातोय. ठाकरेंचे ५ ते सहा खासदार दिल्लीला गेलेत. तेथे लोकसभा अध्यक्षांना पत्र देऊन वेगळा गट स्थापन करण्याची मागणी करणार आहेत. खासदार नॉट रिचेबल झाल्यानंतर ठाकरे गटाकडून संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन फुटीर खासदारांना कडक इशारा दिला. उद्धव ठाकरेंशी गद्दारी करणं सोपं नाहीये. आम्ही आता कायदेशीर लढाई लढणार आहोत असा इशारा राऊतांनी दिला. ठाकरे गट फुटीर खासदारांना अपात्र करण्यासाठी एक मोठा प्लॅन आखला आहे. त्याबाबत खासदार आणि गटनेते अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, रविवारी झालेल्या खासदारांच्या बैठकीत, सर्वांनी आपण पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितलं. या खासदारांपैकी एका खासदाराने साईबाबांची, दुसऱ्याने भवानी मातेची, तर एकाने स्वतःच्या आईची शपथ घेतली. यानंतरही जर कोणी गद्दारी करत असेल तर त्यांना सोडले जाणार नाही, असा इशारा राऊतांनी दिला.

कायदेशीर लढाई सुरू होणार, ठाकरे गटाचा प्लॅन काय?

खासदार अरविंद सावंत यांनी सांगितलं की, रविवारी झालेल्या बैठकीत सर्व खासदार नेते उपस्थित होते. त्यावेळी एकानेही स्वत: हून सांगितलं नाही की आम्ही पक्ष सोडतोय. आमचा आमच्या खासदारांवर विश्वास आहबे, पण ज्याप्रमाणे चर्चा होतेय, बातम्या येत आहेत, त्यावरून आम्ही संविधानानुसार सावधगिरी बाळगत आहोत.

अर्टिकल १० नुसार पक्ष किंवा गट विलीन होत असतो. व्यक्ती होत नाही, त्याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू आहे. त्यानुसार आम्ही लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र देण्यात आले आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. खासदार म्हणजे पार्टी नसते आणि आमदार म्हणजे पार्टी नसते.

त्यापलीकडे पक्ष कार्यकर्त्यांच्या जोरावर बनत असतं. संविधानांतर्गत पक्षांतर्गत ‘फुटी’ला कोणतीही कायदेशीर मान्यता नसल्यामुळे, कोणत्याही बंडखोर गटाला स्वतंत्र मान्यता दिली जाऊ नये, असं अध्यक्षांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटलंय. दरम्यान पक्षांतरबंदी कायद्यानुसार, स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आमदार किंवा खासदार संख्येच्या एकूण संख्याबळाच्या दोन तृतीयांश संख्याबळाची गरज असते. ठाकरे गटाच्या ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यामुळे या गटाला अधिकृत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

"सोडून जाण्यापूर्वी राजीनामा द्या": राऊत

बंडखोर खासदारांवर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले, "ज्यांना पक्ष सोडून जायचं आहे, त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे. ते आमच्या पक्षाचे प्रतिनिधित्व करून निवडून आलेत आणि त्यांना आमच्या मतदारांची मते मिळाली होती. पक्षाने यासंदर्भात 'व्हीप' (आदेश) जारी केलाय. उद्या संसदीय पक्षाची बैठक होणार असल्याचं राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shoking : "मी ईश्वराचा अवतार... म्हणत जाळ्यात ओढलं, IT कंपनीतील महिला मॅनेजरवर सलग २५ वर्ष अत्याचार

Sanchita Ugale Death: 'गरज असताना कोणीही आलं नाही...' अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर प्रसिद्ध अभिनेता भावूक

Maharashtra News Live Update: शिवसेनेच्या ६ खासदारांच्या वेगळा गट स्थापनेला मंजुरी, विलीनीकरणाचा मार्ग मोकळा

Pune Railway Station: पुणे यार्ड रिमॉडेलिंग, ६ नवीन प्लॅटफॉर्म; पुणे रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट!

Veen Doghantali Hi Tutena video : "मी खाणं-पिणं सोडून देईन..."; समर स्वानंदीच्या आयुष्यात एका पाठोपाठ एक संकटं, नव्या ट्विस्टनं राजवाडेंच्या घरात वादळ

SCROLL FOR NEXT