Manasvi Choudhary
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे. श्रावण महिना भगवान शंकराना समर्पित आहे. यंदा १७ सप्टेंबरला पहिला श्रावणी सोमवार साजरा केला जाणार आहे.
श्रावण महिना महादेवांना प्रिय असल्याने या काळात शिवाची पूजा करतात. श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाची मनोभावे पूजा केली जाते. महादेवाच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतात.
श्रावणी सोमवारची पूजा घरच्या घरी कशी करावी, याची पारंपरिक पद्धत जाणून घेऊया.
सोमवारी सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करावे.
त्यानंतर देवघर स्वच्छ करून पाटावर लाल किंवा पांढरे कापड अंथरून त्यावर महादेवांची मूर्ती किंवा शिवलिंगाची स्थापना करावी.
शिवलिंगाला चंदनाचा टिळा लावावा आणि त्यानंतर अक्षता वाहव्यात.
महादेवाला अत्यंत प्रिय असणारी बेलपत्रे तीन किंवा ११ अर्पण करा. सोबतच पांढरी फुले, धतुरा किंवा आकडेची फुले वहा.
महादेवाला जानवे अर्पण करा. तसेच त्या-त्या वाराची शिवामूठ दोन्ही मुठीत धरून देवाला वहा.
देवासमोर धूप आणि कापूर ओवाळा. महादेवाला फळे, साखरेच्या खड्यांचा किंवा उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा.
पूजेच्या शेवटी भगवान शंकराची मनोभावे आरती म्हणावी. "ॐ नमः शिवाय" किंवा "महामृत्युंजय मंत्र" यांचा १०८ वेळा किंवा शक्य तितका जप करावा.