Aditya Thackeray And Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Aditya Thackeray News: '...म्हणून सूरज चव्हाणांवर कारवाई; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंंत्री शिंदेंवर प्रहार

Maharashtra Politics: लोकशाही, सत्य, संविधान ह्यासाठी आमचा लढा आहे आणि आम्ही जिंकणारच, असे ट्वीट करत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

Gangappa Pujari

Aditya Thackeray News:

शिवसेना ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्यात काल ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. सूरज चव्हाण यांच्यावरील कारवाईचा आदित्य ठाकरे यांनी निषेध केला आहे. लोकशाही, सत्य, संविधान ह्यासाठी आमचा लढा आहे आणि आम्ही जिंकणारच, असे ट्वीट करत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

"लोकशाही संपवून आपल्या राज्यात मिंध्यांची टोळी हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहे. जेवढी घाबरट आणि पोकळ राजवट, तेवढी जास्त त्यांची मस्ती आणि एजन्सीचा वापर, अशीच ही मिंधे राजवट, मिंधेंसारखे झुकले नाहीत, म्हणूनच सूरजला सतावले जात आहे," असे गंभीर आरोपही आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) यावेळी केले.

तसेच "भाजप आणि मिंधेंमध्ये सामील झाले नाहीत, कारण ते देशभक्त आहेत, नाहीतर, प्रत्येक भ्रष्ट राजकारण्यांसारखेच मिंधे राजवटीत मंत्री झाले असते, स्वाभिमान, हिंमत, ताकद आणि स्वच्छ मन. सच्चा दिलाचा सूरज आहे. आम्ही सगळेच सत्यासाठी लढत राहू, लोकशाही, सत्य, संविधान ह्यासाठी आमचा लढा आहे आणि आम्ही जिंकणारच, महाराष्ट्र पाहत आहे, जग पाहत आहे," असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राजन साळवींवर गुन्हा दाखल..

सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केल्यानंतर आमदार राजन साळवी यांच्याही अडचणी वाढताना दिसत आहेत. गेल्या दीड वर्षांपासून राजन साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची याप्रकरणी चौकशी सुरू आहे. याच मालमत्तांची चौकशी करण्याकरता आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आमदार राजन साळवी यांच्या घरी पुन्हा छापे मारले. या छापेमारीनंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT