Madha Assembly Election 2024:  Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विधानसभेसाठी अभिजीत पाटलांनी शड्डू ठोकला, माढ्यात पुन्हा रंगणार राजकीय कुस्ती; अजित पवारांसमोर नवं आव्हान!

Madha Assembly Election 2024: माढा विधानसभा मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते अभिजीत पाटील यांनी मोठी घोषणा करत अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.

भारत नागणे

पंढरपूर, ता. १९ ऑगस्ट २०२४

Madha Political Updates: पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, सध्या भारतीय जनता पक्षामध्ये असलेले अभिजीत पाटील यांनी थेट कुस्तीच्या मैदानातूनच विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. माढा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अजित पवार गटाचे आमदार बबन दादा शिंदे यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.

माढ्यामध्ये सामना ठरला!

राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजायला अवघे काही आठवडे उरलेत. त्याआधी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकानंतर विधानसभेलाही महायुती एकत्रित लढणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. अशातच माढा विधानसभा मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते अभिजीत पाटील यांनी मोठी घोषणा करत अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.

अभिजीत पाटील यांची मोठी घोषणा!

अभिजीत पाटील यांच्या समर्थकांनी टेंभुर्णी येथे कुस्त्याचे मैदान आयोजित केले होते. या कुस्ती मैदानासाठी माढा विधानसभा मतदारसंघातून शेकडो समर्थक कार्यकर्ते व कुस्ती शौकीन उपस्थित होते. या वेळी अभिजीत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. आपण विधानसभा निवडणुकीचे मैदान मारण्यासाठीच निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याचे स्पष्ट करत अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबन शिंदे यांना थेट आव्हान दिले आहे.

महायुतीत राजकीय दंगल

कधीकधी जोड नसल्यास आडवून कुस्ती मारावी लागते. कुस्ती हा बुद्धी, चातुर्य, चपळतेचा साहतेचा खेळ आहे. आपणा सर्वांचे प्रेम, आशीर्वाद असेच मिळत राहो. ज्याला जे लक्षात यायला लागलय ते घ्याव, आपण याठिकाणी कुस्ती मारायला आलो आहे, असे म्हणत अभिजीत पाटील यांनी माढ्यातून विधानसभा लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. दरम्यान, अभिजीत पाटलांच्या या निवडणुकीच्या घोषणेनंतर माढा विधानसभा मतदारसंघात थेट शिंदे विरुद्ध पाटील अशी लढत पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT