Abdul Sattar on Vikhe Patil Saam Tv
महाराष्ट्र

Abdul Sattar on Vikhe Patil: माझी छाती फाडून बघितली तर विखे पाटील दिसतील; अब्दुल सत्तर असं का म्हणाले?

Political News: राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत.

डॉ. माधव सावरगावे

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाच्या जोरदार चर्चा सुरु आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आहेत. त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून सासुरवाडी, पुणे, मुंबई आणि नागपुरमध्ये ठिकठिकाणी बॅनर्स झळकले. इतकेच काय तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील तसे बॅनर्स झळकले होते. मात्र या शर्यतीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचं नावही आघाडीवर आहे. (Latest Marathi News)

शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattr) यांना याबाबत विचारले असता त्यांनी हनुमानाचे उदाहरण दिलं आहे. माझी छाती फाडून बघितली तर त्यात राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) दिसतील. कुणाला नाही वाटत आपला मित्र मोठा व्हावा. पण त्यांची अडचण होईल असे मी बोलणार नाही. मला तसे प्रश्नही विचारू नका, असेही ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले सत्तार?

शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने कृषी मंत्री अब्दुल सत्तार काल संभाजीनगरमध्ये होते.या मेळाव्यानंतर अब्दुल सत्तार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्याणी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर थेट भाष्य केलं. (Political News)

माझी छाती हनुमानासारखी फाडून दाखवली तर त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटीलच दिसतील. विखे पाटील मुख्यमंत्री काय त्यापेक्षा मोठे नेते व्हावेत असे मला वाटते. कुणाला नाही वाटत आपला मित्र मोठा व्हावा. पण त्यांना अडचण होईल असे मी बोलणार नाही अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिलीये. यावेळी व्यासपीठावर राधाकृष्ण विखे पाटील आणि रावसाहेब दानवे यांची देखील उपस्थित होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rutuja Bagwe : ऋतुजा बागवेची नवी इनिंग! सुरू केलं स्वत:चं रेस्टॉरंट, लोकेशन काय?

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Smartphone Care: पावसात फोन भिजला? घाबरू नका, 'या' टिप्सने तुम्ही फोन पुन्हा चालू करू शकता

Ladki Bahin Yojana: लाडकीसाठी सर्वात मोठी बातमी! राज्यातील तब्बल ५० लाख महिलांचा लाभ कायमचा बंद, कारणही आले समोर

Bhimashankar : पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त भिमाशंकरमध्ये शिवलिंगावर दुग्धाभिषेक आणि महाआरती | VIDEO

SCROLL FOR NEXT