Maharashtra Politics 2024 Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics 2024 : ' ब्रम्हदेव आले तरी रोखू शकणार नाहीत, त्यांचे १९ आमदार आमच्या संपर्कात': रोहित पवारांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar On Ajit Pawar Group : राष्ट्रवादी पवार गटाचे १८-१९ आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. ब्रम्हदेव आले तरी त्यांचा पक्षातील फूट ते रोखू शकणार नसल्याचं म्हटलं आहे.

Sandeep Gawade

राष्ट्रवादी अजित पवार गटात लोकसभा निवडणुकीनंतर अस्वस्थता पसरली असून त्याचे १८-१९ आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत. ब्रम्हदेव आला तरी त्यांच्या पक्षातील फूट रोखू शकणार नाहीत, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यामुळे त्यांचं अभिनंदनही रोहित पवार यांनी केलं आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते छगन भुजबळ यांना राज्यसभेवर जाण्याची इच्छा होती मात्र त्यांच्या पदरात निराशा पडली. ज्येष्ठ नेते आणि आमदारांमध्ये अस्वस्थता आहे, हे अजित पवार जाणून आहेत. त्यामुळेच त्यांनी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यावी लागली, अशी बोचरी टीका रोहित पवारांनी केली आहे.

अजित पवार भाजपसोबत गेलेलं बारामतीतील जनतेला आवडलेलं नाही, त्यामुळेच त्यांचा लोकसभा निवडणुकीत बारामतीत पराभव झाला. मात्र आता सुनेत्रा पवार राज्यसभेच्या खासदार झाल्याने मी त्यांचे बुधवारी अॅडव्हासमध्ये अभिनंदन केले होतं. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपद अजित पवार गटाने नाकारलं आहे. आता सुनेत्रा पवार यांना राज्यमंत्रिपद दिलं तर त्याचं स्पष्टीकरण त्यांना द्यावं लागेल, असंही रोहित पवार म्हणाले आहेत. `

जयंत पाटील आणि त्यांच्यातील वादावर बोलताना ते म्हणाले, जयंत पाटील आणि मी लोकसभा निवडणुकीतील यशाचं सर्व श्रेय सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांना दिलं आहे. त्यात वादाचं काही कारण नाही. आमच्या बोलण्याचा विपर्यास केला गेल्याचं ते म्हणाले. तसंच येणाऱ्या अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि परराज्यात गेलेले प्रकल्प पुन्हा आणण्यासंबंधी आवाज उठविणार असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

SCROLL FOR NEXT