maharashtra Politics  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : अजितदादांनी शेतकऱ्यांना फसवलं? ठाकरेंच्या आमदाराकडून पोलखोल, VIDEO

ajit pawar vs uddhav thackeray group : उद्धव ठाकरे यांच्या आमदाराने अजित पवारांवर मोठा आरोप केला. अजित पवारांनी शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप ठाकरेंच्या आमदाराने केला आहे.

Vishal Gangurde

बळीराजाला अजित पवारांनी फसवलं. असं आम्ही म्हणत नाही तर हा आरोप केलाय. ठाकरे गटाच्या आमदारानं. शेतकऱ्यांना वीजबील माफी दिली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही या अजित पवारांच्या गर्जनेची खिल्ली का उडवली गेली पाहुया..

पुन्हा केवळ वीज बील माफी दिली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, असं महाराष्ट्राचे उपमुख्यंत्री अजित पवार म्हटलं होते. निवडणुकांच्या तोंडावर नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांनो, लाईट बील भरू नका, अशी राणा भीमदेवी थाटात गर्जना केली. कमालीच्या टाळ्या मिळवल्या.

पुन्हा सत्तेत येण्यासाठी अजित पवार यांनी थेट आश्वासन पूर्ण केलं नाही, तर पवारांची औलाद सांगणार नाही इतकं मोठं वक्तव्य केलं. मात्र अवघ्या ७ महिन्यात अजित पवारांच्या या वक्तव्याची पुरती पोलखोल झाली. आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटिल यांनी अजित पवारांच्या या चुनावी जुमल्याचा कसा पर्दाफाश केलाय. ते पाहा

कैलास पाटील यांनी केलेल्या या आरोपांनी खळबळ माजली. निवडणूकांच्या तोंडावर शेतकऱ्यांना झिरो बील दाखवून ही खोटी बील पाठवण्यात आली आणि राज्यातील बळीराजाला खुल्लमखुल्ला गंडवलं. शेतकऱ्यांनी ज्या महायुतीला भरभरुन मतं दिली आणि उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवारांना पुन्हा उपमुख्यमंत्री केलं त्यांनी आता आपल्या आश्वासनाला जागून बळीराजाला या वीजबील थकबाकीच्या संकटातून सोडवून पवार शब्दाला जागतात याची प्रचिती देण्याची वेळ आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

Ind Vs Eng 4th Test : मँचेस्टरमध्ये इंग्लंडचा रडीचा डाव? कसोटी जिंकण्यासाठी बॉल टॅम्परिंग? पाहा Viral Video

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

SCROLL FOR NEXT