Political News Saam TV
महाराष्ट्र

Political News: शिंदे गट अन् भाजपमध्ये लोकसभा मतदारसंघात अदलाबदल होणार? भाजप खासदार काय म्हणाले?

भूषण अहिरे

Maharashtra Political News:

आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागांवरून राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. अशात धुळे तसेच नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जागांची आदलाबदली होण्याची शक्याता वर्तवली जातेय. मात्र या अफवा असून असे काहीही होणार नसल्याचं मत भाजप खासदार सुभाष भामरे यांनी व्यक्त केलंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाशिक येथे 2027 मध्ये कुंभमेळा आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या लोकसभेच्या जागेसाठी भाजप आग्रही आहे. धुळे आणि नाशिकच्या लोकसभेच्या जागेसाठी भाजप व शिवसेना शिंदे गटामध्ये अदलाबदल होण्याची शक्यता आहे.

यातच धुळे लोकसभेची जागा सध्या भाजपकडे असून विद्यमान खासदार सुभाष भामरे यांनी मात्र या सर्व शक्यता आणि चर्चा फेटाळून लावल्यात. धुळे लोकसभेची जागा ही भाजपालाच मिळणार असल्याचा विश्वास भामरेंनी यावेळी व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशा राजकीय वर्तुळामध्ये राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलताना दिसून येत आहेत. सर्वच पक्षांनी लोकसभा काबीज करण्यासाठी आपापली समीकरणे बांधण्यास सुरुवात केली आहे.

याचाच एक भाग म्हणून धुळे लोकसभा आणि नाशिक लोकसभा जागेमध्ये भाजप व शिवसेना शिंदे गट अदलाबदल करण्याची शक्यता आहे. परंतु सध्या धुळ्यात मात्र भाजपतर्फे विद्यमान खासदार सुभाष भामरे यांनी लोकसभा पुन्हा काबीज करण्यासाठी विकास कामांचा धडाका लावलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yuvraj Singh News : युवराज बनला विराटचा शेजारी, मुंबईत खरेदी केलं अलिशान घरं; किंमत वाचून व्हाल थक्क

Bigg Boss Marathi : निक्कीच्या प्रेमात अरबाजची तहान भूक हरपली, मनधरणी करत म्हणाला…

Relationship Tips : रोजच्या भांडणांमुळे नातं तुटण्याची भीती वाटतेय? आजपासून 'या' टिप्स नक्की फॉलो करा

IND vs BAN: कर्णधार सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा; पहिल्या सामन्यात 'हा' फलंदाज करणार ओपनिंग!

Marathi News Live Updates : डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT