Rohit Pawar News saam tv
महाराष्ट्र

Rohit Pawar News: आमदार रोहित पवार लोकसभेच्या रिंगणात; प्रफुल्ल पटेलांना आव्हान देणार? जिल्हाध्यक्षांचा मोठा दावा

Loksabha Election 2024: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारही लोकसभेच्या निवडणूकीत उतरणार असल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी केला आहे.

Gangappa Pujari

शुभम देशमुख, भंडारा|ता. १ जानेवारी २०२४

Bhandara- Gondia Loksabha Election:

आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. लोकसभांच्या दृष्टीने राजकीय मोर्चेबांधणीला सुरूवात झाली असून मतदार संघांवर दावे- प्रतिदावे केल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारही लोकसभेच्या निवडणूकीत उतरणार असल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी केला आहे.

रोहित पवारही लोकसभेच्या रिंगणात?

5 डिसेंबर 2023 रोजी अमरावती येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला रोहित पवार (Rohit Pawar) यांनी स्वतः पक्षाची बैठक बोलावली होती. त्या ठिकाणी भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील अध्यक्ष म्हणून किरण अतकरी आणि सौरभ रोकडे त्या ठिकाणी उपस्थित होतो. यावेळी रोहित पवार यांनी लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढवण्याचे संकेत दिल्याचे किरण अतकरी यांनी सांगितले आहे.

भंडारा- गोंदिया लोकसभा लढवणार?

रोहित पवार यांनी भंडारा- गोंदिया (Bhandara- Gondia) जिल्ह्याची राजकीय परिस्थितीची पूर्ण माहिती विचारली. त्यानंतर बूथ कमिट्या तुम्ही तयार ठेवा, आपल्याला कोणत्यही परिस्थितीत निवडणूक लढायची आहे... अशा सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तसेच जर रोहित पवार यांनी भंडारा- गोंदिया लोकसभा लढवली तर दुर्लक्षित भंडारा जिल्ह्याचा बारामती झाल्याशिवाय राहणार नाही.. असेही किरण अतकरी म्हणाले. दरम्यान, 3,4 जानेवारी 2024 ला शिर्डी येथे राष्ट्रवादीचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्या शिबिरामध्ये सुद्धा भंडारा-गोंदिया जिल्ह्यातून लोकसभा लढावी अशी आमची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढील ७२ तास धोक्याचे! 'या' ६ जिल्ह्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; IMD चा सर्वात मोठा इशारा

Mumbai : थरकाप उडवणारा अपघात! मुंबईत धावत्या दुचाकीवर अचानक कोसळलं नारळाचे झाड; ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Maharashtra News Live Update: मिरा-भाईंदरमध्ये नारळाचे झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू

पावसाळ्यात तुमच्याही AC मधून घाण वास येतोय? करा 'हे' सोपे काम, मिनिटांत दुर्गंधी होईल गायब

Gold Rate Today: चांदीत ₹५ हजारांची वाढ, सोन्याची किंमतही बदलली, वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

SCROLL FOR NEXT